Friday, October 22, 2021

राज्यात मागील २४ तासात वाढले इतके रुगण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीस कमी होताना दिसत आहे. मात्र असे जरी असले तरी देखील अद्यपाही करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत रोज भर पडतच आहे. तर दुसरीकडे करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.

आज दिवसभरात राज्यात ८ हजार ९५० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ८ हजार १७२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात आज १२४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५९,७४,५९४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.२८ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५२,६०,४६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,०५,१९० (१३.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७७,६१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर

४,१५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,००,४२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.करोना लसींचे दोन डोस घेतल्यामुळे मृत्यूदर कमी झाल्याचं आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आहे. ९५ टक्के मृत्यू रोखण्यात लसींचे दोन डोस यशस्वी ठरले आहेत. तर एक डोस घेणाऱ्या लोकांच्या मृत्यूदरात ८२ टक्के घट झाल्याचं दिसून आलं.

करोनाकाळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना लसींचे दोन डोस देण्यात आले होते. त्यामुळे सर्वात घातक अशा डेल्टा व्हेरिएंटपासून त्यांचं संरक्षण झालं, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी दिली.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!