Monday, October 18, 2021

पंकजा मुंडेंची मोठी घोषणा:तो पर्यंत मी डोक्याला…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बीडमधील भाजप समर्थ बूथ अभियानाच्या कार्यक्रम आज पार पडला. यावेळी  मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी माजी मंत्री पंकजा मुंडेंनी हाक दिली.जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही.

ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत मला कुणी फेटा बांधायचा नाही’ अशी घोषणाच भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केली. तसंच, ‘माझ्या दुसऱ्या पक्षांमध्ये फार चांगले संबंध आहेत. मला वाटतच नाही की मुख्यमंत्री बदलले आहेत, असं म्हणत पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टोमणा हाणला.

तसंच, ज्याला खुर्चीवर बसायचं आहे, त्याला आपण आपआपसात भांडून मरावं असं वाटतं पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी असं केलं नाही, त्यांनी सोशल इंजिनियअरिंग केलं. गोपीनाथ मुंडे यांना विचारलं असता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव समोर ठेऊन राजकारण करत असल्याचं सांगितलं होतं’ असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.

‘माझ्या दुसऱ्या पक्षांमध्ये फार चांगले संबंध आहेत मला वाटतंच नाही की मुख्यमंत्री बदलले आहेत. वाटतच नाही मला कळलं का, माझे पक्षाविषयी माझे समर्पन आहे, माझ्या मनात पक्षाविषयी सन्मान आहे. तसंच माझे दुसऱ्या पक्षात खूप चांगले संबंध आहेत गोपीनाथ गडावर भागवत कराड आले म्हणून मला विचारलं, तेव्हा मुख्यमंत्री

झाल्यावर उद्धव ठाकरे येऊन गेले, छगन भुजबळ मंत्री झाल्यावर आले होते, दोन्ही छत्रपती येऊन गेले अमित शहा येऊन गेले भय्यू महाराज, नामदेव शास्त्री महाराज येऊन गेले. सगळं घेऊन गेले गोपीनाथ गड ही लोकनेते मुंडे साहेबांची समाधीस्थळ आहे’ असंही पंकजा म्हणाल्यात.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!