Wednesday, October 27, 2021

राज्यात २४ तासात आढळले इतके कोरोनाबाधित जाणून घ्या आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, मात्र तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. असे जरी असले तरी करोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत असल्याने, काहीसा दिलासा वाटत आहे.

राज्यात दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ५ हजार ४२४ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ४ हजार ४०८ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय, ११६ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील आज नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ६२,०१,१६८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.८७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या ६४,०१,२१३ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३५२५५ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१२,९१,३८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,०१,२१३ (१२.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५३,८०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,२३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६१,३०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!