Saturday, October 23, 2021

सावधान:भारतात कोविशिल्डची फेक लस, WHO ने जारी केला अलर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात कोरोनाला रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही लशींचा वापर केला जात आहे. यामध्ये भारतात देण्यात येत असलेल्या कोविशिल्डबाबत शंका उपस्थित झाली आहे.

अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्डची लस सीरम इन्स्टिट्यूट तयार करत आहे. आता त्याच नावाने बनावट लशीच्या वायल्स वापरल्या जात असल्याचं समोर आलं असल्याचं वृत्त लाइव्ह मिंटने दिलं आहे.

केंद्र सरकारकडून लसीकरणाची मोहिम पारदर्शकपणे राबवली जावी यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे. कोविन प्लॅटफॉर्मवरून नागरिकांचे लसीकरणासाठी नोंदणी केली जात आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेला भारत आणि युगांडमध्ये बनावट कोविशिल्ड लस आढळली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोविशिल्डबाबत अलर्ट जारी केला आहे. दक्षिण आणि पूर्व आशिया, आफ्रिका याठिकाणी जुलै, ऑगस्टमध्ये बनावट कोविशिल्ड सापडली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याला सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दुजोरा दिला असल्याचं WHO ने म्हटलं आहे. भारताने रुग्णालये,क्लिनिक्स, हेल्थ केअर सेंटर, डिस्ट्रिब्युटर्स, फार्मसींवर लक्ष ठेवलं पाहिजे.

देशात, विविध भागांमध्ये लसीचा पुरवठा करणाऱ्यांनी याबाबत दक्ष राहिलं पाहिजे. त्यांच्याकडून बनावट उत्पादन पुरवलं जाणार नाही याकडं लक्ष द्यायला हवं असंही आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. आढळून आलेले प्रोडक्ट हे खोटे असल्याचं सिद्ध झालं आहे. जाणीवपूर्वक, फसवणूक करण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती दिली जात असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.

भारतात 2 मिलीचे बनावट कोविशिल्ड आढळले. प्रत्यक्षात सीरम इन्स्टिट्यूट अशा प्रकारे 2 मिली (चार डोस) लस उत्पादन करत नाही. तर युगांडमध्ये एक्स्पायरी डेट संपलेली कोविशिल्डची लशीची वायल सापडली. सीरमनेसुद्धा याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...

सावधान:चिकन मुळे कोरोनापेक्षा ही मोठ्या व्हायरसचे संकट

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता...
error: Content is protected !!