Monday, October 25, 2021

राज्यात आजपासून दोन दिवस मुसळधार; हवामान खात्याचा इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. हा पाऊस पडण्याच मुख्य कारण म्हणजे या भागात एक शेअर झोन निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागात पाऊस सुरु आहे.

राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी होते, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे.आता पुढील दोन ते तीन दिवस पुन्हा एकदा काही भागात मुसळधार तर काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये राज्यातील या ठराविक भागांत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. या भागांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा आणि वातावरणाचा परिणाम उत्तर कोकणातही दिसून येणार आहे.

कोकणातील रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर एखाद्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याची माहिती माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!