Wednesday, October 27, 2021

राज्यातील बारावी उत्तीर्ण शेकडो विद्यार्थ्यांचं पुढील शिक्षण धोक्यात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बारावी उत्तीर्ण झालेल्या मात्र अपेक्षेनुसार गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शिक्षण मंडळानं बारावी श्रेणी सुधार योजनेच्या विद्यार्थ्यांना यंदा मूल्यांकन पद्धतीतून वगळलं आहे. यामुळे तब्बल 2500 हुन अधिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं आहे.

एकीकडे कोरोना काळात शिक्षणाचं नुकसान झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी कसे पास होणार हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.प्रणाली कासुर्डे ही २०२० मध्ये बारावी उत्तीर्ण झाली. मात्र तिला विषयांच्या समूहात ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण होते. त्यामुळे तिनं शिक्षण मंडळाच्या ‘श्रेणी सुधार योजनेंतर्गत’ पुन्हा परीक्षा देण्यासाठी प्रवेश अर्ज भरला

कोरोनामुळे पुरवणी परीक्षा रद्द झाली. त्यामुळे तिनं फेबुवारी महिन्यात होणाऱ्या नियमित परीक्षेसाठी अर्ज केला. त्यानुसार परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर झालं. मात्र पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे राज्य सरकारनं 2 जुलै 2021 ला बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

परीक्षेला प्रविष्ठ नियमित आणि बाह्य विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकनाची एक पद्धत ठरवली. मात्र, या मूल्यांकन पद्धतीतून ‘श्रेणी सुधार योजनेंतर्गत’ अर्ज करणाऱ्यांना वगळण्यात आलं. त्यामुळे आता अशा अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं आहे.

इतर विद्यार्थ्यांप्रमाणे आमचंही मूल्यांकन करून गुण देण्यात यावेत किंवा आमची परीक्षाघेण्यात यावी अशी विनंती विद्यार्थी करत आहेत.

एकीकडे राज्यसरकार पत्रव्यवहार करूनही उत्तर देत नाही तर दुसरीकडे CBSE बोर्डाच्या 12वी साठी 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2021 पर्यंत श्रेणी सुधारणा आणि कंपार्टमेंट परीक्षा घेण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपार्टमेंट आणि श्रेणी सुधारणा परीक्षा देश आणि परदेशातील नियुक्त केंद्रांवर घेतली जाणार आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. मग राज्यातील शिक्षण विभागानं या प्रकरणी ठोस निर्णय घेतला पाहिजे .अन्यथा शेकडो मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी संधीच मिळाणार नाही असं काही विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!