Monday, October 25, 2021

आवक घटूनही कांदा बाजार थंडच; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे गेली तीन महिन्यांपासून कांदा आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मात्र बाजारभाव प्रतिक्विंटल दोन हजाराच्या पुढे जात नसल्याने कांद्याची आवक घटत चालली आहे.

येथील बाजार समितीत आज (बुधवारी) सुमारे नऊ हजार कांदा गोण्याची आवक झाली. मात्र खूप मोठ्या प्रणात आवक कमी होऊनही कांदा बाजार भावात अनेक दिवसांपासून वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांदा बाजारासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या बाजार समितीत खरेदी केलेला कांदा थेट मुंबई, बेंगलोर व दिल्लीसह देशातील विविध राज्यात व मोठ्या शहरातही पाठविला जातो. आज बाजार समितीत फक्त नऊ हजार कांदा गोण्याची आवक झाली. तर प्रथम क्रमांकाच्या

कांद्यास फक्त 20 रूपये प्रति किलो म्हणजे दोन हजार रूपये क्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळाला. तालुक्यात अद्यापही मोठ्या प्रमाणात जुना कांदा शिल्लक आहे. तसेच नवीन कांदाही बाजारात येऊ लागला आहे. मात्र यंदा पाऊस अतिशय कमी प्रमाणात तर काही भागात झालाच नसल्याने नवीन कांद्याचे उत्पादन अतिशय कमी आहे.

त्यामुळे नवीन कांदा बाजारात फारसा येणार नाही. ही शक्यात शेतकऱ्यांनी गृहीत धरली आहे. भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होईल अन् बाजारभाव वाढतील या अशेवर शेतकऱ्यांनी आपला कांदा साठवून ठेवला आहे. अनेकदा ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढतात.

त्यामुळे शेतकरी साठवलेला कांदा बाजारभाव वाढल्याशिवाय बाजारात आणत नाहीत. मात्र यंदा कांदा आवक कमी होऊनही बाजारभाव वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

कांदा विक्री तोट्यातच शेतकऱ्यांना कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खताच्या व बियाणाच्या वाढत्या किंमती तसेच मजुरीच्या दरातही झालेली वाढ याचा विचार करता शेतकऱ्यांना कांदा किमान अडीच ते तीन हजार रूपये प्रति क्विंटल दराने विकाला तरच खर्च वसुलीसह शोतकऱ्यांना फायदा होतो.

मात्र सध्या अनेक दिवसांपासून कांदा एक दीड हजारा रूपये दरानेच विकला जात आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकरी कांदा उत्पदनात तोट्यात गेला आहे. एक तर खरीपाची पिके वाया गेली आहेत. अनेक भागात पाऊस अतिशय.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!