Saturday, October 23, 2021

चाळीस वर्षीय व्यक्तीची आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा
तालुक्यातील येवती येथे राहणार्‍या चाळीस वर्षीय गौतम भानुदास आढाव यांनी घरामागील आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, येवती येथील शेतकरी गौतम भानुदास आढाव यांचे चुलत भाऊ रामदास पोपट आढाव यांच्याशी जमिनीच्या व्यवहारावरून गेल्या 6 महिन्यापासून वाद सुरु होते. गौतम आढाव यांच्या नावावरील गट. नं. 358 मधील दिड एकर क्षेत्र रामदास आढाव व इतर यांनी फसवून खरेदी करून घेतले.

यासंदर्भात कौटुंबिक बैठक झाली तेव्हा एक महिन्याच्या आत 21 लाख रुपये द्या आणि जमीन घ्या. नाहीतर जमीन मिळणार नाही असे म्हणून वेळोवेळी मयत गौतम आढाव यांना त्रास दिल्यामुळे त्यांनी अखेर आत्महत्येचा मार्ग स्विकारत चुलत भाऊ रामा आढाव याच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल केले होते.

तसेच त्यांच्याजवळही याच मचकूराची चिट्ठी पोलिस प्रशासनाला मिळाली आहे. मयताची पत्नी छाया गौतम आढाव यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात रामदास पोपट आढाव, दादा पोपट आढाव, पोपट सखाराम आढाव आणि जिजाबाई पोपट आढाव या चार जणांविरोधात भादवी कलम 306, 420, 504, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मयत आढाव यांच्या पश्चात दोन मुले, आई, वडील,  पत्नी असा परिवार आहे.  या घटनेचा पुढील तपास पो नि संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. सई बोराडे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!