Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील पतसंस्थेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळावर फसवणूकांचा गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पद्मश्री ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील ठेवीची रक्कम बुडाल्याने पतसंस्थेचे अध्यक्ष शरद पेरणेंसह तालुक्याचे ज्येष्ठनेते सुभाष पाटील, शशिकला पाटील व संचालक मंडळावर राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

भिमराज जयवंत रहाणे रा. कुक्कडवेढे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, पद्मश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, वांबोरी यांच्याकडे ठेव ठेवलेली ठेव पावतीची रक्कम मुदत संपल्यानंतर होणारे व्याजासह रक्कम फिर्यादीस देणे असताना पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळात कर्तव्यात असताना देखील त्यांनी रक्कम रुपये 6 लाख 10 हजार 510 रुपये अदा न करता रकमेची फसवणूक केली.

रहाणे यांच्या फिर्यादीवरून अध्यक्ष शरद शिवाजी पेरणे, उपाध्यक्ष जनार्दन राघुजी ढोकणे, संचालक सुभाष दत्तात्रय पाटील, दिलीप यशवंत पाटील, शशिकला सुभाष पाटील व इतर 7 ते 8 जण यांच्याविरुद्ध गु.र.नं. 691 भा.दं.वि.कलम 420, 409, 34 व महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स अ‍ॅक्टचे कलम 3 प्रमाणे फसवणुकीचा दाखल करण्यात आला.

हा गुन्हा जिल्हा न्यायालय 9 व अतिरिक्त सत्र न्यायालय, अहमदनगर यांच्याकडील जावक क्र . 4943 / 2021, दि.12.8.2021 अन्वये क्री एमए नं. 46/2021 अन्वये सीआरपीसी 156 ( 3 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पो.नि. नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. धाकराव हे पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!