Wednesday, October 27, 2021

नवरा अनसैर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करतो मग महिलेने घेतला हा पवित्रा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नवरा अनसैर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करतो म्हणून मुंबईत राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेने नवऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. महिलेचा नवरा एका मोठ्या वित्तीय कंपनीत उपाध्यक्षपदावर असून महिला सुद्धा स्वत: एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करते.

नवऱ्याबरोबरच तिने सासू-सासरे आणि कुटुंबीयांवरही हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला आहे.महिलेने पवई पोलीस ठाणे गाठले. तिने कुटुंबातील आठ सदस्यांवर हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला आहे. आयपीसीच्या कलम 498 अ आणि 377 (अनैसर्गिक शरीरसंबंध)

या कलमांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. अजून या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही. तपास सुरु आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

2013 मध्ये माझे लग्न झाले. त्यानंतर सासू-सासरे, दीर आणि नवऱ्याने सुद्धा हुंड्यासाठी माझा छळ सुरु केला, असे महिलेने पोलिसांनी दिलेल्या जबानीत म्हटले आहे. नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना वेळोवेळी मी आर्थिक मदत केली, तरी त्यांनी अनेकद मला मारहाण केली, असा आरोप महिलेने केला आहे.

अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्यासाठी नवरा आपल्यावर जबरदस्ती करतो, असा आरोपही महिलेने तिच्या तक्रारीत केला आहे. रोजच्या होणाऱ्या या त्रासाला कंटाळून महिलेने अखेर तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!