Monday, October 25, 2021

मोठी बातमी : संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: कोरोना संपुष्टात आलेला नाही. तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. गर्दी वाढत राहिली तर तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल, असं सांगतानाच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला तर राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुंबई महानगर पालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही.तो ज्यावेळी 700 मेट्रिक टन टच करू एवढं ऑक्सिजनची गरज आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज पडल्यास राज्यात कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.आज जनतेच्या सेवेसाठी दोन आरोग्यसेवेचे लोकार्पण झाले आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे.

आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही. तरी आपण सर्व गोष्टींची तयारी ठेवत आहोत. त्याच अनुषंगाने लहान मुलांना कोव्हिडची लागण झाली तर त्यांना रुग्णलयाचं भयावह वातावरण न वाटता चांगलं वातावरण तयार करण्यासाठी हे सेंटर उभारले आहेत, असं ते म्हणाले.आता सुद्धा मी गर्दी बघितली. ही गर्दी योग्य नाही.

आपण सर्व काळजी घेऊन अर्थचक्र सुरू राहावे म्हणून काही निर्बंधामध्ये शिथिलता आणली आहे. कोणत्याही राजकीय स्वार्थ किंवा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असं वर्तन करू नका. सर्व राजकीय पक्षांना, धार्मिक, सामाजिक संघटनाना मी विनंती करतो की, आपल्यामुळे

नागरिकांचा जीव धोक्यात येईल किंवा येतोय असं काही करू नका, असं कळकळीचं आवाहन करतानाच कोरोना संकट अजूनही टळलेलं नाही. आपल्याला हे टाळायचा आहे. आपण जर नियम पाळले नाहींतर कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल.

लॉकडाऊन टाळायचा असेल तर कोणीही कितीही चिथावणी दिली, भडकवलं तरी त्यांच्या चिथावणीला दाद देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!