Tuesday, January 18, 2022

पारनेरच्या महिला तहसीलदाराचे आमदार लंकेंवर गंभीर आरोप ?सुप्रिया सुळे म्हणाल्या…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला आहे. यावेळी ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप केले आहेत. यामुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे.

देवरे यांनी ऑडिओ क्लिपमध्ये वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचाही उल्लेख केलेला आहे. दरम्यान, या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी माहिती काढलेली असून मी स्वतः त्यांच्या संपर्कात आहे.

ज्यावेळी कोणत्याही महिलेचा विषय येतो तेव्हा आपण सर्वांनी संवेदनशीलपणे विचार केला गेला पाहिजे. एखादी क्लिप आली म्हणजे समज गैरसमज होतात. त्यामुळे त्या महिलेची प्रायव्हसी देखील जपली पाहिजे. आम्ही त्यात स्वतः जातीने लक्ष घालत आहोत, त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वासू ठेवू नये, एवढच मी सांगू शकते.”

या प्रकरणामुळे भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर हल्ला चढवला होता.आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमधून संताप व्यक्त करत चित्रा वाघ म्हणाल्या,

“सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होत आहे का तेच आता पाहायचंय.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!