Thursday, January 20, 2022

नगर जिल्ह्यात या ठिकाणी विम्याचा लाभ घेण्यासाठी चक्क ट्रक चोरीचा बनाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ट्रक चोरी गेल्याची खोटी फिर्याद देवून विम्याचा लाभ घेण्याऱ्या दोन आरोपींना ट्रकसह गडाआड करण्यात अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तर पसार आरोपी पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे (रा. प्रभाग दोन, श्रीरामपूर) याचा पोलीसांकडुन शोध सुरु आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (ता. १५) रोजी रेहान आयूब शाह (वय २९, रा. बाबरपूरा चौक, पाण्याच्या टाकीजवळ, श्रीरामपूर) याने आपल्या मालकीचा दहा टायरचा ट्रक (एमएम १७ बीवाय ५५५९) क्रमांकाचा ट्रक येथील सम्राटनगर (सुतगिरणी) परिसरातील स्टील कंपणीतुन गुरुवारी (ता. १२) रोजी सांयकाळी अज्ञात चोरट्याने चोरी नेल्याची फिर्याद दिली होती.

त्यावरुन शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शहर परिसरामध्ये ट्रक चोरीच्या घटना घडल्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः लक्ष देत गुन्ह्याचा तपासासाठी स्वतंत्र पथक नेमले.

त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने गुप्त माहिती काढुन खात्रीशीर पडताळणी करुन रेहान शहा व त्याच्या साथीदारांनी विमा कंपणीकडून विम्याचे पैसे वसूल करण्यासाठी ट्रक चोरी गेल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे उघड केले.

पोलीसांनी रेहान शाह याला ताब्यात घेवून त्याची कसुन चौकशी केली. प्रारंभी तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. मात्र पोलीस खाक्या दाखविताच त्याने आपला साथीदार ईत्तू शेख व पप्पू गोरे याच्या मदतीने ट्रकच्या विम्याचे पैसे विमा कंपणीकडून वसूल करण्यासाठी ट्रक चोरीस गेल्याचा बनाव करुन खोटी फिर्याद दिल्याचे कबुल केले.

त्यानंतर पोलीसांनी इफ्तेकार उर्फ इत्तू इस्माईल शेख (रा. प्रभाग दोन, श्रीरामपूर) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून सहा लाख रुपये किंमतीचा दहा टायरचा ट्रक जप्त करुन शहर पोलीस ठाण्यात हजर केले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!