Monday, January 17, 2022

पारनेर ऑडिओ क्लिप प्रकरणात नवा ट्विस्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. ‘खचून जाऊ नका, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा.

वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचा आदर्श ठेवून बदलीला न घाबरता काम करा,’ असा सल्ला हजारे यांनी त्यांना दिला. त्यांच्याकडून राखीही स्वीकारली. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही कालच अण्णा हजारे यांची या प्रकरणी भेट घेतली होती. त्यामुळे देवरे आणि हजारे यांच्या भेटीबद्दलही उत्सुकता होती.

पारनेर तालुक्यासह राज्यात या प्रकरणाची चर्चा आहे. शनिवारी आमदार लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी देवरे यांच्याविरुद्धचा चौकशी अहवाल हजारे यांना दिला. हजारे यांच्यासोबत त्यांची चर्चाही झाली. पारनेर तालुक्याची बदनामी होत असेल तर

याप्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू, असंही हजारे यांनी आमदार लंके यांना आश्वासन दिले. देवरे यांनी हजारे यांची भेट घेण्याआधीच आमदार लंके यांनी भेटून आपली बाजू मांडल्याचं सांगण्यात आलं.

त्यानंतर आज सकाळीच देवरे यांनीही अण्णा हजारेंची राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली. त्यांच्यासोबतही हजारे यांनी चर्चा केली. सुरुवातीला अण्णांनी देवरे यांना भेट नाकारल्याची चर्चा पसरली होती. प्रत्यक्षात मात्र हजारे व देवरे यांची भेट झाली आहे. देवरे यांना अण्णा म्हणाले, या प्रकरणाची माहिती

मिळाल्यापासून नेमकं काय घडले आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, संपर्क होत नव्हता. खचून जाऊ नका, धीराने परिस्थितीला समोरे जा. अधिकारी म्हणून लोकसेवेचे काम करताना अपमान पचवण्याची ताकद ठेवली पाहिजे.

वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे पाहा. त्यांच्या आजपर्यंत किती वेळा बदल्या झाल्या? तरीही ते डगमगत नाहीत. आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. असा सल्लाही हजारे यांनी दिला. जनतेचे काम करताना आरोप होत असतात. मलाही यासाठी तुरुंगात जावे लागले होते, असंही हजारे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!