Monday, January 17, 2022

ऑनलाईन पेमेंटसाठी ‘आरबीआय’चा नवा नियम ;जाणून घ्या काय आहे नवीन नियम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पेमेंट अॅग्रीगेटर आणि ई-कॉमर्स कंपन्यांना ग्राहकांच्या बँकेच्या माहितीची साठवणूक करण्यापासून रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) नवे नियम आणण्याची तयारी करत आहे. या नव्या नियमांमुळे ग्राहकांना डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करताना आपल्या कार्डचा १६ अंकी क्रमांक आणि इतर माहिती दरवेळी भरावी लागणार आहे.

अर्थात, ‘सेव्ह कार्ड डिटेल्स’ हा पर्याय बंद होण्याची शक्यता आहे.डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा क्रमांक १६ अंकी असतो. ऑनलाइन पेमेंट करताना अनेक वेळा संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर एकदा कार्डचा क्रमांक, एक्स्पायरीची तारीख आणि सीव्हीव्ही क्रमांक भरला की ‘सेव्ह कार्ड डिटेल्स’ असा पर्याय येतो.

त्याद्वारे पुढील व्यवहारावेळी ही सर्व माहिती पुन्हा भरावी लागत नाही. मात्र, आपल्या कार्डची माहिती संबंधित संकेतस्थळावर, म्हणजेच कंपनीकडे साठवली जाते. रिझर्व्ह बँकेचा सुधारित नियम पेमेंट अॅग्रीगेटर्स आणि ई-कॉमर्स मर्चंटला ग्राहकांच्या कार्डची माहिती सर्व्हर किंवा डेटाबेसमध्ये साठवून ठेवण्यापासून रोखू शकतात.

मात्र, त्यासाठी ग्राहकांनाही प्रत्येक ऑनलाइन व्यवहारासाठी कार्डची सर्व माहिती पुन्हा पुन्हा भरावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने डेटा स्टोरेज धोरणावर आपल्या काही प्रस्तावित मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या आहेत, ज्या जानेवारी २०२२ पासून लागू होऊ शकतात.

फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न -सध्या ग्राहक ऑनलाईन संकेतस्थळावर दुसऱ्यांदा पेमेंट करत असेल तर केवळ सीव्हीव्ही आणि ओटीपी टाकणे आवश्यक असते; कारण कार्डवरील इतर माहिती ऑनलाईन संकेतस्थळांवर सेव्ह होत असते. याद्वारे ऑनलाईन फसवणूकही होऊ शकते. ते रोखण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

आरबीआयने यासंबंधित पेमेंट गेटवे कंपन्याचा प्रस्ताव नाकारला आहे, ज्यात ग्राहकांच्या कार्डसंबंधित माहिती त्यांच्या सर्व्हरवर साठवून ठेवण्याची परवानगी मागण्यात आली होती.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!