Thursday, January 20, 2022

नगरची जिल्हा परिषद फक्त विकायची राहिली:खा सुजय विखे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शहर बाह्यवळण मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची सुरूवात वाळुंज येथे नगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप उपस्थीत होते. 40 किलो मिटर अंतराच्या 1 हजार 26 कोटी रूपयांचा हा प्रकल्प दोन वर्षात पुर्ण होणार आहे. 

यावेळी बोलताना खासदार सुजय विखे यांनी नगर जिल्हा प़रिषदेच्या कारभारावरही टिका केली. ते म्हणाले की नगरची जिल्हा परिषद फक्त विकायची बाकी असुन ती दहा टक्क्यांची दुकानदारी झाली आहे. प्रत्येक कामासाठी टक्केवारी चालते. त्यांच्या निधीतून सध्या झालेली कामे पहा. त्यांची अवस्था पहा. किती खायचं याचे लिमीटच नाही. मुळासकट माती ही खाली जात आहे अशी टिका विखे यांनी केली.

यावेळी डॉ. विखे म्हणाले की, इतके वर्ष राजकारण पाहतो पण आघाडी सरकार आल्यापासुन प्रथमच डीपी चे उदघाटन करायला मंत्री येतात. 10 लाखांच्या कामासाठी 10 तास भाषणे ठोकतात. महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात ज्या कामांचे भूमिपुजने केली ती फडणवीस सरकारच्या काळात मंजुर झालेली आहेत.

 याचा हिशेब घेऊनच आम्ही आगामी निवडणुकींच्या मैदानात उतरणार आहोत. दुसर्‍यांचे कामे आपल्या नावावर खपवण्याचे बोगस धंदे आम्ही कधीच केले नाहीत.नगर शहरात उड्डाणपुल होण्यासाठी 10 वर्ष लागले. मात्र आता शहर बाह्यवळण मार्गावर 7 उड्डाणपुल होणार असुन यामुळे नगरचा लुक बदलणार आहे. नगरचा उड्डाणपुल सहा महिन्यात पुर्ण होणार आहे अशी माहिती खासदार विखे यांनी दिली.

कार्यक्रमास सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रविंद्र कडुस, मनोज कोकाटे, दिलीप भालसिंग, सुरेश सुंबे आदि उपस्थीत होते.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!