Saturday, January 22, 2022

इंदोरीकर महाराजांना सवाल: या सत्तेतील बेलगाम घोड्यांना हत्ती”म्हणतं बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात पारनेरच्या तहसीलदारांनी केलेल्या गंभीर आरोपांची चर्चा होत आहेत. याच प्रकरणात इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला असून, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी इंदुरीकर महाराजांवर टीकास्त्र डागलं आहे.तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झालेली आहे. ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपांमुळे नवा वाद उभा राहिला आहे. दरम्यान, हे प्रकरण चर्चेत असतानाच निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या विधानाने आणखी एक वाद उभा राहण्याची चिन्हं असून, इंदुरीकर महाराजांनी केलेल्या विधानावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?
‘राज्यातील भोळ्याभाबड्या भगिनी मन लावून ज्यांचं किर्तन ऐकतात, त्या ह.भ.प.नी एका महिलेचीचं प्रशासकीय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होणाऱ्या त्रासाची तुलना ‘कुत्री भुंकतात’ अशी करणं अतिशय दुदैवी… या सत्तेतील बेलगाम घोड्यांना ‘हत्ती’ म्हणतं बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का??’, असा सवाल करत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शरद पवार यांच्या नावाने कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. तेथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेलं असून, इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित करण्यात आलेलं होतं. यावेळी इंदुरीकर यांनी आमदार लंके यांचं कौतूक केले.

‘राज्यातील बहुतांश आमदार-खासदार साखर स्रमाट, शिक्षण सम्राट तर कोणी उद्योगपती आहेत. मात्र, त्यांना कोणाला असे सेवाभावी वृत्तीचे कोविड सेंटर उभारण्याचे सूचले नाही. ते काम लंके यांनी करून दाखविले’, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

‘हत्ती गावात आला की त्याच्यावर कुत्री भुंकत असतात. परंतु हत्ती आपली चाल बदलत नाही तो ध्येयाकडे चालत राहतो. त्यामुळे लंके तुमच्यावर कोणी कुत्री भुंकत असली, तरी तुम्ही त्याकडे लक्ष न देता तुमची वाटचाल सोडू नका. कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो, तसे लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही’, असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!