Tuesday, January 18, 2022

मंत्री थोरातांच्या मतदारसंघात संगमनेरकरांनी ठाकरे सरकारच्या नाकावर टिच्चून मंदिरे खुली ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्या श्रावण महिना सुरू आहे. तरी देखील देव-धर्म मंदिरात बंदिस्त केले आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असतानाही राज्यातील ठाकरे सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. ही तालिबानी मानसिकता राज्यातील जनता सहन करणार नाही, असा इशारा भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे.

संगमनेर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत तुषार भोसले बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचे आवाहन आहे की, श्रावणी सोमवारला राज्यातील मंदिरे उघडली जावीत. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू. अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी हा अन्याय सहन करणार नाहीत.

मंदिरांवर अवलंबून असलेल्या गोरगरिबांची उपासमार आता सहन होत नाही. राज्यात महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे सरकार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा मतदारसंघात संगमनेरकरांनी ठाकरे सरकारच्या नाकावर टिच्चून मंदिरे खुली केली आहेत. ठाकरे सरकारच्या तालिबानी नियमांना अक्षरशः तिलांजली दिली आहे.

भाविकांना पवित्र असणाऱ्या श्रावण महिन्यात मंदिरे पूजा-आरती व दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली. त्यानिमित्ताने संगमनेरकरांचे मनापासून अभिनंदन. दारू व्यवसायात महसूल जास्त मिळतो म्हणून दारूचे धंदे चालू आहेत आणि मंदिरे बंद आहेत. शिर्डी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान आहे. येथे अनेक गोरगरीब, छोटे-मोठे व्यावसायिक व्यवसाय करून पोट भरतात.

मात्र, त्याकडे जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे दुर्लक्ष आहे. पालकमंत्री बाहेरचे आहेत. त्यांना लक्ष घालण्यासाठी वेळ नाही, असेही भोसले म्हणाले.

तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली. भाजप शहराध्यक्ष अॅ ड. श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, किसान मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतीष कानवडे, भाजप युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस योगीराज परदेशी, अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष गुंजाळ महाराज, रोहिदास कडलग महाराज, अध्यात्मिक आघाडी शहराध्यक्ष किरपाल डंक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!