Friday, January 21, 2022

स्पामध्ये आता सेक्स रॅकेट थांबवण्यासाठी या मसाजवर बंदी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अनलॉक नंतर आता पार्लर आणि स्पा मसाज सेंटर्सना सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी त्याचा उपयोग अवैध प्रकारे केला जात असल्याचं समोर आलं आहे. नुकतीच नागपूरमधील सलूनमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.

ही घटना ताजी असताना आता देशाची राजधानी दिल्लीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्पा सेंटरमधील अवैध प्रकारांवर आळा घालण्यासाठी दिल्लीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. स्पा सेंटरमधून देहव्यापार आणि सेक्स रॅकेट होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

स्पा सेंटरमध्ये विरुद्ध लिंगी व्यक्तीचा स्पा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच महिलांनी पुरुषांचा आणि पुरुषांनी महिलांचा स्पा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी त्याचं स्वागत केलं आहे. ह्या निर्णयामुळे सेक्स रॅकेटवर आळा बसेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लैंगिक शोषण आणि देहव्यापार रोखण्यासाठी राष्ट्रीय राजधानीतील स्पा आणि मसाज सेंटर चालवण्यासाठी कठोर नवीन नियमांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये स्पा करण्यासाठी जर पुरुष स्पा सेंटरला आला तर पुरुषानेच स्पा करावा असं म्हटलं आहे तिथे महिलांना स्पा करण्यावर बंदी लावण्यात आली आहे.

‘मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, ‘स्पा आणि मसाज केंद्रांमध्ये विरुद्ध सेक्सच्या व्यक्तीद्वारे मालिश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पुरुषांच्या मालिशसाठी पुरुष मालिश करणाऱ्यांसाठी तर महिलांच्या मालिशसाठी महिला मालिश करणाऱ्यासाठी तरतूद करण्यात येईल.’ याशिवाय 18 वर्षांपेक्षा कमी

लोकांना अशा ठिकाणी कामावर ठेवण्यासाठी बंदी लावण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र याबाबत सध्या तरी कोणतेही निर्देश काढण्यात आले नाहीत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!