Tuesday, January 18, 2022

सुखी संसार लागली नजर, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा टोकाचा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पतीचा अचानक मृत्यू झाला त्यामुळे धक्का बसलेल्या पत्नीने सुद्धा पतीच्या प्रेमासाठी आपली जीवनयात्रा संपवल्याची मन हेलावून टाकणारी घटना विरारमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पुर्वेकडील मनवेलपाडा येथील दादूस क्लासिक या इमारतीत नरेंद्रसिग परमार ( वय 24) हा पत्नी संतोषकुवर परमार (वय 22) हिच्यासह राहत होता. मंगळवारी नरेंद्रसिंग यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले होतं.

उपचारानंतर त्याला रात्री 11 वाजता घरी आणण्यात आले होते. मात्र पोटदुखी आणखी वाढली आणि त्यातचं त्याचा मृत्यू झाला. घरात एकटी असेलल्या त्याची पत्नी संतोषकुंवर उर्फ बबली हिला पतीच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. त्यामुळे तिने पतीच्या शेजारीच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी संतोषकुवरचा भाऊ रात्रपाळीवरून घरी आल्यानंतर दार बंद दिसले. दुसर्‍या चावीने दार उघडले असता हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

याप्रकरणी विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नरेंद्रसिंग परमार हा मिरा रोड येथील किराणा मालाच्या दुकानात काम करत होता. अडीच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर दोघेही विरारमध्ये एकत्र राहत होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. पण, अचानक नरेंद्रसिंग यांचं पोटाच्या आजाराने मृत्यू झाला.

त्यामुळे पतीने साथ सोडून गेल्यामुळे पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला, त्यातून तिने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!