Saturday, January 22, 2022

नगर ब्रेकींग: रेल्वे ब्रिजजवळ आढळला मृतदेह

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात व्यक्तीने टणक व कठीण हत्याराने पाठीवर, डोक्यावर व हातापायावर मारल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील अरणगाव ते सोनेवाडी जाणार्‍या रेल्वेच्या ओव्हरब्रिजजवळ पोलिसांना मृतदेह  आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटली असून तो विकास कदम (मुळ रा. सातारा) यांचा असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत माहिती अशी, दि. 25 ऑगस्टला सकाळी नऊच्या दरम्यान अरणगाव ते सोनेवाडी रस्त्यावरील रेल्वे ओव्हरब्रीजच्या रोडच्या बाजूस खाली उताराला वनदास पांडुरंग पुंड यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली अज्ञात इसमाचा मृतदेह पडलेला होता.

सुमारे चार दिवसांपूर्वी त्याठिकाणी मारहाण करून फेकलेला तो असावा, असा पोलिसांना संशय आहे. अज्ञात आरोपींनी मृत इसमास टणक व कठीण हत्याराने पाठीवर, डोक्यावर तसेच हात-पायावर गंभीरपणे मारले होते. मारहाणीत मयताच्या फुफ्फुसाला अंतर्गत जखमा झाल्या.

मृतदेहाची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुका पोलिस ठाण्यात पोहेकॉ. रमेश गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यता आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप करत होते.

तपासात हा मृतदेह मुळ सातारा येथील रहिवाशी असणार्‍या विकास कदम यांचा असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मयत कदम कुटुंबियांसह केडगाव येथील वैष्णवीनगर परिसरातील रहिवाशी आहेत. मयत कदम ड्रायव्हर म्हणून काम करत होते. मयत कदम यांना मारहाण करणार्‍या आरोपींचा शोध नगर तालुका पोलिस घेत आहेत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!