Tuesday, January 18, 2022

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1 सप्टेंबरपासून बदलणार हे 5 नियम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजकाल सर्वजण स्मार्टफोन वापरतात आणि सिनेमागृह बंद झाल्याने तरुणच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण OTTकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे. ओटीटीवर सिनेमा, वेबसिरीज, डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. तुम्हीही जर ओटीटी प्लॅटफॉर्म वापरत असाल ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

1 सप्टेंबरपासून स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी 5 नियमात बदल करण्यात आले आहेत. त्याचा थेट काय परिणाम होणार हे नियम कोणते आणि कसे बदलण्यात आले आहेत. ते आज आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मपासून ते शॉपिंगसाईटपर्यंत सगळ्याचेच दर वाढणार आहेत.

1 सप्टेंबरपासून OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन महागणार आहे. युझर्सना बेस प्लॅनसाठी 399 रुपयांऐवजी 499 रुपये मोजावे लागणार आहेत. युझर्सला आधीच्या प्लॅनपेक्षा आता 100 रुपये जादा भरावे लागणार आहेत.

त्याच वेळी, 899 रुपयांमध्ये, युझर्सना फोनमध्ये Disney + Hotstar अॅप चालवू शकतील. या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये HDमध्ये देखील उपलब्ध असणार आहे. तुम्ही हे अॅप 4 स्क्रीनवर 1,499 रुपये मोजून 4 क्रिनवर वापरू शकता.

1 सप्टेंबरपासून अमेझॉनवरून ऑर्डर करणं महाग होऊ शकतं. डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे कंपनी लॉजिस्टिक्स खर्च वाढवू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला 500 ग्रॅमच्या पॅकेजसाठी 58 रुपये मोजावे लागू शकतात. राज्यानुसार किंवा विभागानुसार खर्च 36.50 रुपये असेल.

15 सप्टेंबरपासून गुगल प्ले स्टोअरवरील 100 अॅपसाठी विशेष दस्तऐवज आणि काही तरतुदी नियम बदलण्यात आले आहेत. ते दिल्याशिवाय तुम्हाला हे अॅप वापरता येणार नाहीत. गुगल ड्राईव्ह युझर्ससंदर्भात 13 सप्टेंबरला एक अपडेट मिळणार आहे. त्यानुसार गुगल असिस्टंटची जागा आता गुगल ड्राईव्ह घेणार का हे पाहावं लागणार आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!