Saturday, January 22, 2022

49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 85600 कोटी रुपये पोहोचले, तुमच्या खात्यावर आले?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रब्बीचा 2021-22 चा हंगाम आता संपला आहे. 18 ऑगस्ट पर्यंत सरकारने433.44 लाख टन गहू खरेदी केला आहे. या दरम्यान, 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 85600 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. रब्बीचा हंगाम एप्रिल ते मार्च पर्यंत चालतो.

परंतु, गव्हाची मोठ्या प्रमाणात खरेदी एप्रिल-जून कालावधीत केली जाते. देशात सरासरी उत्पादन हेक्टरी 36 क्विंटल पर्यंत आहे. मात्र, पंजाब आणि हरियाणामध्ये ते 50 क्विंटलपर्यंत आहे. करण वैष्णवी (DBW-303) च्या नावाने या वर्षी एक प्रजाती अधिसूचित करण्यात आली आहे, जी सरासरी 80 क्विंटल पर्यंत उत्पन्न देऊ शकते. काही प्रगतशील शेतकऱ्यांनी यावेळी या प्रजातीचा वापर केला आहे.

कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार, गहू उत्पादनाच्या बाबतीत एकट्या उत्तर प्रदेशचा वाटा 34.89 टक्के आहे. यूपी, पंजाब, हरियाणा, राजस्थान, एमपी आणि बिहार मिळून देशातील 93.31 टक्के गव्हाचे उत्पादन करतात. पंजाबचा हिस्सा 21.55, हरियाणा 13.20, मध्य प्रदेश 8.81, राजस्थान 8.57 आणि बिहारचा वाटा 6.2 टक्के आहे.

सरकारने एक वर्षापूर्वी धानाचा (सामान्य वाण) एमएसपी 1868 रुपये प्रति क्विंटलवरून 2021-22 (जुलै-जून) पीक वर्षासाठी 1940 रुपये प्रति क्विंटल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे चालू वर्षासाठी बाजरीचा एमएसपी गेल्या वर्षी 2150 रुपयांवरून 2250 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.

भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेचे संचालक डॉ ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांच्या मते, 80 च्या दशकाच्या अखेरीस आपण गव्हाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो होतो. सरकारने 1993 नंतर ‘सॉर्टेजपासून सरप्लस’ हा नारा दिला होता. भारतात प्रति एकर 15,000 रुपये इचका खर्च येतो. तर काही विकसित

देशांमध्ये खर्च फक्त 10-12 हजार रुपये येतो.
कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणानुसार भारताने 2019-20 दरम्यान नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, सोमालिया, कोरिया आणि बांगलादेशला 439 कोटी रुपयांच्या गव्हाची निर्यात केली.

भारतीय अन्न महामंडळ (FCI) नुसार, 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत आमच्या सरकारी गोदामांमध्ये 367.54 लाख टन गव्हाचा साठा होता. कृषी खर्च आणि किंमती आयोग (सीएसीपी) नुसार, रब्बी विपणन हंगामासाठी (आरएमएस -2021-22) गव्हासाठी किमान आधारभूत किंमत 1975 रुपये प्रति क्विंटल आहे. कमिशननुसार त्याची किंमत 960 रुपये प्रति क्विंटल आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!