Thursday, January 20, 2022

पुन्हा झोडपणार पाऊस; 11 जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :गेल्या आठवड्यात राज्यात पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली होती. पण दरम्यानच्या कालावधीत पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार व्हायला सुरुवात झाली आहे.

सध्या बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे पूर्व विदर्भासह महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे.

पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील एकूण अकरा जिल्ह्यांत मुसळधार सरी कोसळणार आहेत.

आज बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या अकरा जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.संबंधित अकरा जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहेत.

त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा तसेच मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील चार दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!