Thursday, October 5, 2023

सावधान तुम्ही पण ऑनलाइन चॅटिंग’ करताना चुकूनही ‘या’ ५ गोष्टींबाबत चर्चा करू नका…

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाइन चॅटिंग करताना तुम्ही अनेकदा समोरच्याला ‘मला असे म्हणायचे नव्हते’ असे स्पष्टीकरण दिले असेल. हे असे घडते जेव्हा आपले विचार किंवा शब्द ते ज्या पद्धतीने

बोलले जातात त्याप्रमाणे समोरच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे अनेकवेळा नातेसंबंध बिघडण्याची परिस्थिती निर्माण होते. समोरासमोर बोलतना अनेक गोष्टी सांगण्यासाठी खूप धैर्य लागते, त्या उलट ऑनलाइन

चॅटिंगमध्ये अनेक वेळा काही मर्यादा ओलांडल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या चुकूनही ऑनलाइन चॅटिंग करताना बोलू नये.जर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी एखाद्याची माफी मागायची असेल, तर नेहमी

समोरासमोर जाऊन माफी मागा. कारण अनेकदा असे दिसून येते की मेसेजद्वारे माफी मागितल्यावर समोरची व्यक्ती असभ्य वर्तवणूक दाखवते किंवा ती मेसेजकडे दुर्लक्ष करते. त्याच कारण म्हणजे तो व्यक्ती

तुमच्या भावना नीट समजू शकत नाहीत, कारण तो तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहू शकत नाही.जेव्हा कोणी एखाद्या गोष्टीबद्दल रागवत किंवा नाराज होतं तेव्हा ते मेसेजद्वारे तुमच्यावर राग व्यक्त करू शकतात किंवा

तुमच्या भावना दुखावतील अशा गोष्टी बोलू शकतात. मात्र, समोरासमोर संवाद करताना समोरच्या व्यक्तीकडे पाहून परिस्थितीचा अंदाज लावणे सोपे जाते. समोरची व्यक्ती दु:खी आहे किंवा नाराज आहे हे आपण

समजू शकतो. शिवाय तो नाराज असल्यामुळे रागवल्याचंही आपणाला समजतं. मात्र, ऑनलाईन चॅटिंग करताना तो व्यक्ती असा का बोलतोय हे समजत नाही.काही महत्वाची गुपित समोरासमोर संवाद

करत असणाच उघडली पाहिजेत. कारण चॅटिंगमध्ये अनेक गोष्टी सेव्ह राहतात. अशा स्थितीत तुमचं एखादं गुपित जर कुणाच्या चॅट लिस्टमध्ये असेल तर ते कुणी वाचणार नाही? ना अशी भीती मनात कायम राहते.

फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी कधीही चॅटिंगचा पर्याय निवडू नका. कारण अशा स्थितीत समोरची व्यक्ती तुमचा चुकीचं समजू शकते. शिवाय त्याच्यामनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतो.

कोणत्याही गोष्टीवर आर्ग्युमेंट करण्यासाठी चॅटिंग हा एक चांगला पर्याय नसल्याचं सिद्ध होतं. कारण अशा स्थितित दोघेही आपापली बाजू मांडत असतात त्यामुळे एकमेकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत.

या उलट समोरासमोर संवाद करताना, तुम्हाला एकमेकांचा बाजू समजून घेण्याची संधी मिळते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!