माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीचा आपल्या आयुष्यावर या ना त्या कारणानंतर परिणाम होत असतो. त्यामुळे 21 व्या शतकातही अनेक जण
चाणक्य नीती फॉलो करताना दिसतात. आपली संपत्ती ही आपण आपल्या मेहतनीवर उभारलेली असते त्यामुळे आपल्या संपत्ती बद्दल कधीच कोणालाही सांगू नका. आपला पगार, आपल्याकडे किती
संपत्ती आहे या गोष्टी कायमच आयुष्यात गुप्त ठेवा तुम्ही जर का या गोष्टी कोणालाही सांगितल्यात तर त्याचा तुम्हाला चांगलाच फटका होण्याची शक्यता आहे. तुमचा आयुष्यात कधीही
अपमान झाला असेल तर त्या गोष्टींची चर्चा कधीही कोणापाशी करू नका. कोणत्याही वयातील व्यक्तीकडून मग ती स्त्री असो वा पुरूष, त्यांच्याकडून अपमान होत असेल किंवा झाला असेल तर त्याबाबत कोणालाही सांगू नका.
तुमच्या गुणांबद्दल कधीच कोणाही पाशी काही बोलू नका. याचा गैरफायदा घेरणाही अनेक मंडळी तुम्हाला आजूबाजूला भेटतील. तेव्हा या अशा गोष्टी कायमच गुप्त ठेवा.
स्त्री – पुरूषांमधलं नातं हे फारसं कोवळं असतं. त्यामुळे आपल्यालाही त्याप्रकारे काळजी घ्यावी लागते. आपल्या पत्नीबद्दलच्या कोणत्याही गोष्टी इतरांना सांगू नयेत. त्यानं तुमच्या नात्यात अडचणंही येऊ शकते.