माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारने नॅनो यूरिया नंतर आता नॅनो डीएपीला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मन्सुख मंडविया
यांनी आज (दि.४) ट्विटच्या माध्यमातून दिली. नॅनो युरियानंतर नॅनो डीएपीलाही भारत सरकारने मान्यता दिली आहे. आता एक बॅग डीएपी, एका बाटलीमधून उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.नॅनो डीएपी प्रति 500 मिलीलीटरची बाटली 600 रुपयांना मिळेल. एक बाटली डीएपीच्या एका बॅगच्या बरोबरीची असेल. त्याची किंमत सध्या 1,350 रुपये आहे. दरम्यान,
भारताला परकीय चलनाची बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच सरकारी अनुदानात लक्षणीय घट होईल.सरकारच्या या निर्णयानंतर नॅनो डीएपीच्या व्यावसायिक उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
तसेच लवकरच शेतकर्यांना उपलब्ध होणार आहे.युरियानंतर डीएपीचा शेतकरी सर्वाधिक वापर करतात. देशात दरवर्षी या खतांपैकी ९० लाखांहून अधिक टनपेक्षा जास्त वापर केला जातो. याची निम्म्याहून अधिक
कच्च्या मालाची आयात केली जाते. युरियाच्या ५० किलो बॅगऐवजी इफ्फो लिक्विड नॅनो युरियाची बाटली वापरली जाते.शेतीतून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, ज्याचा
परिणाम पर्यावरणीय प्रदूषणासह मातीच्या सुपीकतेवर होत आहे. त्यामुळे खतांचा वापर कमी करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञान फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. आयएफएफसीओ या
कंपनीने काही वर्षांपूर्वी नॅनो युरिया सुरू केला. त्यामुळे बॅगमधून मिळणारी खते आता ५०० मिलीलीटर बाटलीमधून मिळत आहेत.