Friday, October 22, 2021

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेंनी घेतला पालकमंत्र्यांचा समाचार म्हणाले ते फक्त

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त भाजपकडून समर्थ बूथ अभियान, किसान सन्मान योजना व लाभार्थी सन्मान दिवस साजरा करण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे भाजपा व युनायटेड सिटी हॉस्पिटल अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याहस्ते व आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या शिबिरात परिसरातील तीनशेहून अधिक रुग्णांनी सहभाग घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी, पीक, जनावर वाहून गेली, घर पडली मोठे नुकसान झाले परंतु अद्यापही पालकमंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला वेळ मिळाला नाही व नुकसानग्रस्तांना भरपाई देखील देता आलेली नाही. पालकमंत्री जिल्ह्यात फक्त झेंडा फडकवायला येतात व बैठका घेऊन निघून जातात अशी टीका माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी येथे केली.

यावेळी कर्डिले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त देशाचा कारभार सुरू असून संरक्षण विकास आणि आरोग्याला देणारे पंतप्रधान देशाला प्राधान्य देणारे लाभल्याने जगात भारताची पत वाढली आहे. देशाला एक कणखर आणि धाडसी निर्णय घेणारा पंतप्रधान लाभला असल्याचे कर्डिले म्हणाले.

आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विकासाभिमुख योजना देशात राबवल्या जात आहेत. संरक्षण विकास आरोग्य आणि पारदर्शकता या चारसुत्रीच्या माध्यमातून देशाची महासत्तेकडे वाटचाल करण्याचे काम मोदी यांच्या माध्यमातून सुरू आहे. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ अमोल नरसाळे, माजी सरपंच संतोष शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव शुभम मोटे यांनी केले होते.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सरचिटणीस दिलीप भालसिंग, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, बाजार समितीचे संचालक बाबा पाटील खर्से, भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव आव्हाड, वैभव खलाटे, बंडू पाठक, श्रीकांत आटकर, पोपटराव गवळी, विजय गवळी, संजय नवल,

डॉक्टर बबनराव नरसाळे, अण्णासाहेब शिंदे, एकनाथ झाडे, साहेबराव गवळी, विजय कुटे, बापू मिरपगार, संभाजी सोलाट, ग्रामपंचायत सदस्य विकास मिरपगार, सरपंच अशोक दहातोंडे, उपसरपंच अरुण बनकर, आदिनाथ झाडे, आदिनाथ वाघ, सुनील औताडे, डॉ. अतुल गुगळे, डॉ. पियुष मराठे, डॉ. सुवर्णा होशिंग आदी उपस्थितीत होते.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!