Friday, October 22, 2021

फक्त एक लाख रुपये गुंतवून सुरु करा ‘हा’ व्यवसाय, काही वर्षांनी व्हाल लखपती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रत्यक्ष शेती किंवा शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणीही वाढली आहे.

त्यामुळे शेतीसोबतच्या जोडधंद्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता.गावाकडे तुमची जमीन असेल तर त्यावर चंदनाची शेती हा चांगला पर्याय ठरू शकतो. ही एकप्रकारे दीर्घकालीन गुंतवणूक असली तरी त्यामधून मिळणारा फायदाही तितकाच जास्त असतो. चंदन लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चंदनाची मागणी

आपल्या देशात तसेच परदेशात खूप जास्त आहे. चंदनाच्या लागवडीत तुम्ही जितका पैसा खर्च करता त्यामध्ये अनेक पटीने नफा मिळतो. यामध्ये तुम्ही अवघे लाखभर रुपये गुंतवून 60 लाखांच नफा मिळू शकता.ग्रामीण भागातील
गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागामध्ये चंदनाच्या शेतीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. चंदनाच्या लागवडीतून भरपूर नफा होतो.

याच कारणामुळे आजकाल तरुणांचा नोकरीपेक्षा याकडे जास्त कल आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ येथील एका उत्कृष्ट पांडे या तरुणाने अधिकाऱ्याची नोकरी सोडून गावात चंदनाची शेती सुरु केली. यामधून त्याला बक्कळ फायदा मिळाला. त्यामुळे ग्रामीण भागात नोकरी करण्याऐवजी चंदनाची शेती हा उत्पन्नाचा चांगला मार्ग ठरू शकतो.

चंदनाची शेती कशी कराल?:चंदनाची झाडे दोन प्रकारे तयार केली जाऊ शकतात, पहिली सेंद्रिय शेती आणि दुसरी पारंपारिक पद्धतीने. सेंद्रिय पद्धतीने चंदनाची झाडे तयार करण्यासाठी सुमारे 10 ते 15 वर्षे लागतात आणि पारंपारिक पद्धतीने झाड वाढण्यास सुमारे 20 ते 25 वर्षे लागतात. चंदनाची रोपं इतर झाडांच्या तुलनेत बरीच महाग असतात.

मात्र, मोठ्याप्रमाणावर रोपं खरेदी केल्यास चंदनाचे एक रोप साधारण 400 रुपयांना पडते.चंदनाच्या शेतीमधून कशी कमाई होते?:चंदनाच्या शेतीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर परतावा मिळण्यास दीर्घ काळ लागतो. मात्र, यामधून मिळणारा फायदाही घसघशीत असतो. भारतात चंदनाची किंमत सुमारे 8-10 हजार रुपये प्रति किलो आहे, तर परदेशात

त्याची किंमत 20-25 हजार रुपये आहे. एका झाडामध्ये सुमारे 8-10 किलो लाकूड सहज उपलब्ध होते. दुसरीकडे, जर आपण जमिनीबद्दल बोललो, तर एका एकरातील चंदनाच्या झाडापासून 50 ते 60 लाख मिळू शकतात.

ताज्या बातम्या

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...
error: Content is protected !!