Friday, October 22, 2021

महत्त्वाचे:PAN-Aadhaar लिंक करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढली, आता या तारखेपर्यंत सवलत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारने पुन्हा एकदा आधार कार्डला पॅन कार्डशी जोडण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. आता तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी 31 मार्च 2022 पर्यंत लिंक करू शकता. आयकर विभागाने शुक्रवारी नवीन अधिसूचना जारी करताना ही माहिती शेअर केली आहे.

यापूर्वी 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती: आतापर्यंत पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर होती आणि आयकर विभागाने स्पष्टपणे सांगितले होते की जे लोक वेळेवर पॅनला आधारशी लिंक करत नाहीत, त्यांना 10,000 रुपयांचा मोठा दंड भरावा लागू शकतो. मात्र, नवीन अधिसूचना जारी होताच विभागाने हा तणाव दूर केला आहे. यानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत जे पॅन-आधार लिंक करणार नाहीत त्यांच्यावर दंड आकारण्याची कारवाई केली जाऊ शकते.

पॅनला आधारशी जोडण्याची प्रक्रिया:
1. आपले पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी, आपण प्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटला भेट दिली पाहिजे.
2. या वेबसाईटमध्ये तुम्हाला ‘लिंक आधार’ चा पर्याय दिसेल.
3. या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.

4. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक आणि तुमची काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
5. यानंतर, ‘सबमिट’च्या बटणावर क्लिक करताच तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधारशी लिंक होईल.

पॅन-आधार लिंक नसल्यास काय होईल?:जर तुम्ही 31 मार्च 2022पर्यंत तुमच्या पॅन कार्डाशी आधार कार्ड लिंक करू शकत नसाल तर तुम्ही पुढे पॅन कार्ड वापरू शकणार नाही. तुमचे पॅन कार्ड 31 मार्च 2022 नंतर निष्क्रिय केले जाईल. यानंतर, तुम्हाला ना बँक खाते उघडता येणार आहे ना तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा

लाभ घेऊ शकणार आहात. तसेच, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकणार नाही. तसेच, जर पॅन कार्ड रद्द केल्यानंतर वापरण्यात आले, तर ते आयकर कायद्यांतर्गत कलम 272B चे उल्लंघन मानले जाईल. अशा परिस्थितीत पॅन धारकाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!