Friday, October 22, 2021

माजी मंत्री राम शिंदेंना मोठा धक्का; या जवळच्या सहकार्याने सोडली साथ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला धक्के देणं सुरूच ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या जिल्हास्तरावरील निष्ठावान मानल्या गेलेल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. आता कर्जत नगरपंचायतीचे भाजपचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून लवकरच

ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनाही हा मोठा धक्का मानला जात आहे.कर्जत शहरातील भाजपचे नेते, नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष आणि सध्याचे उपनराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आज भाजपमधील

प्राथमिक सदस्यासह सर्व पदांचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.आपली भूमिका मांडताना राऊत म्हणाले, ‘पक्ष सदस्यत्वचा राजीनामा हा माझा एकट्याचा निर्णय आहे. काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे.

थोड्याच दिवसात सर्वांशी सार्वजनिकरित्या बोलणार आहे. माझ्या या निर्णयाला महासंग्राम युवा मंचचीही समंती आहे. राजकीय जीवनात काम करत असताना माजी खासदार स्व. दिलीप गांधी, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, प्रा. भानुदास बेरड, अभय आगरकर

यांचे नेहमी सहकार्य लाभले. भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याविषयी नाराजी नाही. जनतेची कामे करत असताना एखाद्या राजकीय पक्षाची गरज असते, ते लक्षात घेऊन माझी पुढील राजकीय दिशा ठरविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे,’ असं म्हणून त्यांनी भाजपवर नाराज नसल्याचंही सांगितलं आहे.

रोहित पवारांबद्दल काय म्हणाले राऊत?:‘राष्ट्रवादीचा नगरपंचायतमध्ये एकही सदस्य नसताना आमदार रोहित पवार यांनी निधी दिला. शहरातील जनतेची कामे केली. त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला आवडली. अर्थात त्यांच्याकडून अद्याप कोणताही शब्द देण्यात आलेला नाही किंवा मीही आपेक्षा ठेवलेली नाही. चांगल्या निर्णयांच्या पाठीशी राहण्याची आपली भूमिका आहे.

माझ्या या निर्णयाबरोबर जनताही शंभर टक्के सोबत राहील याची खात्री आहे,’ असं नामदेव राऊत यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!