Sunday, October 17, 2021

शिवाजी कर्डीले राहुरी नाही तर या मतदारसंघातून विधानसभा लढवणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :विधानसभा लढण्यासाठी अनेकांनी बाशिंग बांधले आहे. अनेकांना आमदार होण्याची इच्छा असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात उमेदवार वाढण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास नगर तालुक्यातील पाऊण लाख मतदारांमधूनही आमदार होवू शकतो ही चर्चाही पुढे आली आहे.

राजकीय पुर्नवसनपासून लांब राहिलेले माजीमंत्री शिवाजी कर्डीले हेही श्रीगोंद्यातून विधानसभा लढण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशिर माहिती आहे. ‘व्याह्यां’ची मदत घेवून आमदार होवू शकतो का याची चाचपणी सुरु झाल्याची माहिती आहे.

श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते यांचे राजकीय वर्चस्व संपविण्यासाठी दिवंगत शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप व प्रा. तुकाराम दरेकर यांनी एकास एक लढतीचा केलेला प्रयत्न कमालीचा यशस्वी झाला होता. त्यातून राहूल जगताप हे आमदार झाले होते. या तिघांच्या निधनानंतर

तालुक्यात सगळेच नेते स्वयंभू झाले आहेत. आमदारकीला अजून वेळ असला तरी मध्यावधी लागू शकतील या शंकेतून अनेकांनी तयारी सुरु केली आहे. गेल्यावेळी काठावर पराभूत झालेले घनशाम शेलार यांनी पुन्हा एकदा नव्या उमेदीने लोकसंपर्काच्या जोरावर मैदानात उतरण्याची तयारी चालवली आहे.

एक नव्हे तर अनेक उमेदवार यावेळी विधानसभेला उभे असतील ही सध्याची शंका आहे.याच पार्श्वभुमिवर माजीमंत्री कर्डीले हेही श्रीगोंद्यातून नशीब अजमाविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. वाळकी व चिचोंडीपाटील हे नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत.

तेथे साधारण ७५ हजार मतदार आहेत. या दोन्ही गटांवर कर्डीले यांचे एकहाती वर्चस्व आहे. कर्डीले यांचे व्याही आमदार अरुणकाका जगताप यांचा मांडगवण गटात वर्चास्मा आहे. त्या गटात ४२ हजार मतदार आहेत. श्रीगोंदे मतदार संघात ३ लाख ११ हजार एकुण मतदार आहेत. तालुक्यात जर दोनपेक्षा जास्त तगडे उमेदवार राहिले तर मतांची होणारी विभागणी पथ्यावर

पडून नगर तालुक्यातील उमेदवाराला संधी मिळू शकते हे राजकीय गणित समोर येत आहे.कर्डीले विधानपरिषद लढण्याच्या तयारीत असले तरी त्यांना त्याबाबतीत अजून हिरवा कंदील मिळाला नसल्याने तेथे त्यांना थांबावे लागले तर श्रीगोंदे विधानसभा मतदार संघ त्यांना खुनावत असल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत.

त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरु झाल्याची माहिती आहे.भाजपाचे नेते आमदार बबनराव पाचपुते गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यातच त्यांचे बंधू सदाशिव अण्णा पाचपुते यांचे अकाली निधन झाल्याने त्यांचे कार्यकर्ते काहीसे अस्वस्थ आहेत. त्यामुळे कर्डीले हे भाजपाकडूनच उमेदवारी मागून लढण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते.

ही शक्यता गृहीत धरली व पाचपुते आजारी असले तरी त्यांच्याएवढा तगडा लोकसंपर्क कुणाचाही नाही हेही नाकारता येणार नाही. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची मजबूत फळी केवळ पाचपुते यांचीच असल्याने कर्डीले यांना भाजपाच्या उमेदवारीसाठी झगडावे लागणार आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!