Monday, October 18, 2021

किरीट सोमय्या आतंकवादी, दरोडेखोर का बलात्कारी?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे आतंकवादी, दरोडेखोर का बलात्कारी आहेत? त्यांनी कशामुळे कोल्हापुरात यायचं नाही? आता महाराष्ट्रात अधिकृतपणे आणीबाणी घोषित करा. सोशल मीडियावर लिहायचं नाही. ताबोडतोब नोटीस, अटक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं स्वातंत्र्य नाही”, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोष व्यक्त केला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर स्थानबद्धची जी कारवाई करण्यात आली त्यावर संताप व्यक्त केला.

किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्याला जाण्याचं नियोजन केलं आहे. ते उद्या (20 सप्टेंबर) कोल्हापूरला दाखल होणार आहेत. पण त्याआधीच त्यांना मुंबईत स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसेच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस बजावली आहे. त्यामध्ये त्यांनी सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

पण किरीट सोमय्या हे कोल्हापुरला जाण्यावर ठाम आहेत. सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे सोमय्या उद्या मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यातही जाणार आहेत. त्यावर मुश्रीफ समर्थकांनी तुम्ही येऊनच दाखवा, असा इशारा दिलाय.

याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांच्यावर मुंबईत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या घराबाहेर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यावर सोमय्या यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.किरीट सोमय्यांना तुम्ही का अटक करणार आहात? त्याचं कारण द्या.

अजूनही किरीट सोमय्या यांना लेखी नोटीस देण्यात आलेली नाही. किरीट सोमय्या वारंवार सकाळपासून नोटीस द्या, अशी मागणी करत आहेत. कधी आयजी समजवण्याचा प्रयत्न करतात. किती यंत्रणा दबावाखाली काम करतेय. गेल्या तीन दिवासांपासून मी लांबून पाहतोय. किरीट सोमय्या यांना मुंबईतल्या गणपती विसर्जनाला जाऊ दिलं जात नाहीय.

त्यापेक्षा आणीबाणीच घोषित करा”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.“माझं आणि सोमय्या यांचं सातत्याने बोलणं सुरु आहे. सोमय्या हे इतके आक्रमक नेते आहेत की ते असल्या दडपशाहीला घाबरनार नाहीत. जेव्हा झेड सुरक्षा नव्हती तेव्हाही ते फिरत होते. ज्यांना झेड सुरक्षा आहे त्यांना फिरायला बंदी करताय? किरीट सोमय्या

उद्या हायकोर्टात जातील. ज्यांना झेड सुरक्षा आहे त्यांना तुम्ही फिरायला बंदी करताय तर तुम्ही सर्वसामान्यांचं वाटोळंच करणार”, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!