Wednesday, October 27, 2021

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले ….म्हणून मी गंमत केली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मला माजी मंत्री म्हणू नका. दोन-तीन दिवसांत कळेल’, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. मात्र, ते विधान करण्यामागची भूमिका स्पष्ट करत चंद्रकांत पाटलांनी राजकीय चर्चांमधील ‘राजकीय सस्पेन्स’ला पूर्णविराम दिला.

पुण्यात एका कार्यक्रमात सूत्रसंचालकाने चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री असा केला. त्याला अडवत माजी मंत्री म्हणू नका असं पाटील म्हणाले होते. त्यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या. वेगवेगळे अंदाज लावले जात असतानाच आज चंद्रकांत पाटील यांनी त्या विधानामागील कारणाचा उलगडा केला.

पुण्यात कसबा गणेश मंडळाला भेट दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘दोन दिवसाआधी जे वाक्य वायरल झालं, ते गंमतीत म्हणालो होतो. कारण कार्यकर्ते सारखे माजी मंत्री म्हणून अनाऊन्स करत होते. त्यामुळे म्हणालो माजी म्हणू नका, दोन दिवस बघा काय होतं. ही बोलण्याची पद्धत आहे’, असं म्हणत पाटील यांनी ‘दोन-तीन दिवस थांबा’ या विधानामुळे सुरू झालेल्या चर्चांना पूर्ण विराम दिला.

देवेंद्र फडणवीस-जयंत पाटील भेट
देवेंद्र फडणवीस व जयंत पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यांच्या अचानक भेटीचीही चर्चा झाली. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, ‘राजकारणामध्ये मैत्री जपावी लागते. जयंत पाटील यांनी बोलावलं आणि ते गेले. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही’, असं पाटील म्हणाले.

अजित पवारांचा चेहरा उघडा पडला
अजित पवारांनी पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासास विरोध दर्शवला आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘अजित पवारांचा चेहरा उघडा झाला आहे. पेट्रोल-डिझेलला जीएसटीमध्ये आणण्यास विरोध का करताहेत हे त्यांनी सांगावं’, असा सवाल पाटील यांनी केला.

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की, पिंपरी-चिंचवडचे? इतर जिल्हे त्यांना माहितीच नाही. त्यांनी आतापर्यंत पिंपरी चिंचवडमध्येच बैठका घेतल्या. आता स्वतःच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं सांगत आहेत’, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!