Monday, October 18, 2021

तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात दिवसाला इतक्या हजार रुग्णांचा अंदाज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता ओसरली असली तरीही आता तिसरी लाट यापेक्षाही अधिक तीव्र आणि गंभीर स्वरुपाची असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीसह, राज्य स्तरावर आरोग्ययंत्रणांची तयारी सुरु आहे. याच धर्तीवर विविध शहरांतील आरोग्ययंत्रणांच्या

प्रमुखांची नुकतीच बैठक झाली. यात औरंगाबादमधील महापालिकेची आरोग्य यंत्रणाही तिसऱ्या लाटेसाठी विविध पातळीवर सज्ज असल्याची माहिती औरंगाबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.राज्याच्या आरोग्य विभागातर्फे शनिवारी व्हिडिओ कॉन्सफन्सिंगद्वारे विविध शहरांतील आरोग्य प्रमुखांची ठक घेण्यात आली.

तिसऱ्या लाटेत एका दिवसात जास्तीत जास्त १६ हजार ८३९ रुग्ण आढळतील, असा अंदाज गृहीत धरून यंत्रणांची उभारणी करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 27 मार्च 2021रोजी सर्वाधिक 11 हजार 226 सक्रिय रुग्ण दाखल झाले होते. तिसऱ्या लाटेत एकाच दिवसात

16 हजार 839 सक्रिय रुग्ण दाखल होऊ शकतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. यातील 65 टक्के म्हणजे 10 हजार 945 रुग्ण लक्षणे नसलेले असण्याची शक्यता आहे. 35 टक्के रुग्णांना (5,893) लक्षणे असतील. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे लागेल. त्यातील निम्मे रुग्ण सरकारी दवाखान्यांमध्ये, तर निम्मे खासगी दवाखान्यांमध्ये दाखल होतील.

दरम्यान, औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्च 2021 पासून महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून अन्य जिल्ह्यातून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील प्रवेशद्वारा वरती अँटीजन चाचणी करण्यात येत आहे .

यानुसार 19 सप्टेंबर रोजी शहरातील 6 प्रवेश द्वारावरती 823 जणांची कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली.यात चिकलठाणा, हर्सूल टी पॉईंटवर, कांचनवाडी, झाल्टा फाटा, नगर नाका, दौलताबाद टी पॉईंट येथे एकूण 283 जणांची अँटीजन कोरोना चाचणी करण्यात आली.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!