Saturday, October 23, 2021

महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या त्या प्रांताधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एका महिला तलाठ्याकडे प्रांताधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याची घटना उघडकीस आली होती. पीडित महिलेनं मॅटकडे तक्रार दाखल केल्यानंतर महसूल विभागात एकच खळबळ उडाली होती.

याप्रकरणी विशाखा समितीकडून जिल्हा प्रशासनाला चौकशी अहवाल सादर केला आहे. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने संबंधित प्रांताधिकाऱ्याला नोटीस बजावली असून संबंधित घटनेबाबत खुलासा मागवला आहे.

सोपान कासार असं आरोप झालेल्या प्रांताधिकाऱ्याचं नाव आहे. महिला तलाठ्याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात विनयभंग, दमदाटी करण्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बदलीस पात्र नसतानाही संशयित आरोपीने ज्येष्ठतेचे नियम डावलून नांदगाव तालुक्यात पीडित महिला तलाठ्याची बदली केली होती. या प्रकरणी पीडित महिला तलाठ्यानं मॅटकडे धाव घेतली होती.

त्यानंतर 23 ऑगस्टपर्यंत मॅटने बदलीस स्थगिती दिली होती.दरम्यान, पीडितेनं येवला पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी मांढरे यांनी विशाखा समितीकडून याबाबत अहवाल मागवला होता. अलीकडेच विशाखा समितीनं जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे.

त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यानं संबंधित प्रांताधिकाऱ्याला नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. त्यामुळे आरोपी प्रांताधिकाऱ्याच्या अडचणींत वाढ झाली आहे.जिल्हा प्रशासनाने येवला प्रांताधिकारी सोपान कासार यांच्यावर कारवाई का करू नये? अशी विचारणा जिल्ह्याधिकाऱ्यांनी संबंधित नोटीशीत केली आहे.

विशेष म्हणजे विशाखा समितीने सादर केलेल्या अहवालात देखील कासार यांच्यावर विनयभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कासार यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...

सावधान:चिकन मुळे कोरोनापेक्षा ही मोठ्या व्हायरसचे संकट

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता...
error: Content is protected !!