Sunday, October 17, 2021

करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात आरोग्यमंत्री टोपेंची दिलासादायक माहिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी अनेक नियम लागू केले असले तरी थोडी फार तरी गर्दी झालीच होती. त्यामुळे पुन्हा करोना डोकं वर काढणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाहीत असं राजेश टोपे यांनी सांगितली आहे.

महाराष्ट्रात सध्यातरी करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते. परंतु सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते असे असले तरी पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही असंही ते म्हणाले.

राज्यात सध्या दररोज १३ ते १४ लाख जणांना लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे. त्यामुळे नागरिकांनी करोनाच्या नियमांचं पालन करावं असं आवाहनदेखील टोपे यांनी जनतेला केलं. राज्यात दररोज १५ ते २० लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून त्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचं देखील टोपे म्हणाले.

मात्र, सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता” “लसीकरणाची गती वाढवली तर मोठ्या प्रमाणात संक्रमण टाळता येईल” जालन्यात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले स्पष्ट.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!