Monday, October 25, 2021

भंडारदरा,मुळा नंतर नगर जिल्ह्यातील हे धरण ओव्हरफ्लो होणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गत आठवड्यात भंडारदरा पाणलोटात धो-धो पाऊस झाला. त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर निळवंडेत जोरदार आवक होत होती. हे धरण 94 टक्के भरले. पण पाऊस सुरू असल्याने या धरणातील पाणीपातळी कायम ठेऊन निळवंडेतून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पाऊस कमी झाला.

पण भंडारदरातून विद्युत गृह क्रमांक एक मधून 816 क्युसेक व वाकीचा ओव्हरफ्लो 98 क्युसेक पाणी निळवंडेत जमा होत आहे.दरम्यान नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण 11039 दलघफू क्षमतेचे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्या पाठोपाठ आता आज-उद्या 8320 दलघफू क्षमतेचे धरण निळवंडे धरणही

आज 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 8270 दलघफू (99.31) पाणीसाठा होता.भंडारदरा प्रकल्पांतर्गत प्रवरा खोर्‍यातील आढळा मध्यम प्रकल्पाच्या आढळा उजवा कालवा वितरीका क्रं.1 व वितरीका क्रं.1 वरील चारी क्रं. 1,2,3,4 च्या पुर्नस्थापना व नुतनीकरण

 कामास एकूण 4 कोटी 87 लाख 90 हजार 568 रूपयांच्या प्रस्तावास अटींवर प्रशासकीय मान्यता जलसंपदा विभागाने दिली आहे. या निधीतून विमोचने, फॉल्स, प्रवाहमापन यंत्रे, गावरस्ता पूल या बांधकामाची दुरूस्ती तसेच पोहोच रस्ते व पाणी वापर संस्था स्तरीय कामे मार्गी लागणार आहेत.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!