Monday, October 25, 2021

बापरे! सोयाबीनच्या भावात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घसरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जून, जुलै मध्ये सोयाबीनचे दर 10 हजारांच्या पुढे गेले होते. मध्यंतरीही 11 हजारांच्या पुढे गेले होते. परदेशात कॅटल फिड म्हणून सोयाबीनचा वापर होतो. ड्राय ऑईल केक (डीओसी) म्हणजेच पेंडचा वापर देशात तसेच विदेशात होतो. सोयाबीनपासून खाद्य तेला बरोबरच जनावरांसाठीचे खाद्य तसेच पोल्ट्रीसाठी खाद्य बनविले जाते. खाद्य तेलालाही भाव त्या काळात वाढले होते.

याशिवाय करोनामुळे अंड्यांना मोठी मागणी वाढली होती. कोंबड्यांना दिले जाणारे सोयाबीनयुक्त खाद्यामुळे अंड्यांचा आकार चांगला होतो. अशी पोल्ट्रीधारकांची धारणा आहे. परिणामी अंड्यांना करोनामुळे चांगली मागणी असल्याने हे प्रोटिनयुक्त खाद्याची मागणी वाढली. देशांतर्गत भाव वाढण्याचे कारण सोयाबीन परदेशात निर्यात होत होते.

भाव वाढल्याने सरकारने सोयाबीन निर्यात बंद केली. त्यामुळे सोयाबीनचे भाव गडगडल्याचे यातील जाणकार सांगतात. काल अस्तगाव येथे सोयाबिनचे दर 6 हजार रुपये क्विंटल इतके होते. जून मध्ये मृग नक्षत्रातील पडलेल्या पावसाने सुरुवातीला ज्यांनी पेरले होते. त्यांच्या सोयाबीन आता निघू लागल्या आहेत.

काल श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा येथील काही शेतकर्‍यांनी सोयाबीन अस्तगाव येथे विक्रीस आणली होती. या सोयाबीनला 6 हजार रुपये इतका भाव मिळाला.लातूरच्या बाजारात सोयाबीनच्या भावात सोमवारी प्रतिक्विंटल २ हजार ७०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. इतक्या मोठ्या घसरणीमुळे उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लातूरच्या बाजारपेठेत १८ सप्टेंबरला सोयाबीनचा प्रति क्विंटल भाव ८ हजार २०० रुपये होता.

सोमवारी २० सप्टेंबरला सौद्यात तो ६ हजार २०० रुपये तर पोटलीत (तडजोडीचा भाव)५ हजार ५०० रुपये एवढा घसरला. जुलै महिन्यात सोयाबीनचे भाव १० हजारांपेक्षा अधिक होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात केलेली घट, सोयाबीन पेंडीची विदेशातून १२ लाख टनांची केलेली आयात यामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव गडगडायला सुरुवात झाली.

सौद्यात मिळालेला भाव ६ हजार २०० असला तरी पोटलीत त्याला ५ हजार ५०० रुपयांची मागणी सप्टेंबरअखेर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारपेठेत यायला सुरुवात होईल. एका दिवसात बाजारपेठेत सोयाबीनच्या भावात तब्बल २७०० रुपयांची घसरण झाली आहे. सौद्यात मिळालेला भाव ६ हजार २०० असला तरी पोटलीत त्याला ५ हजार ५०० रुपयांची मागणी होती.

ओलाव्याचे प्रमाण, मातीचे प्रमाण हे निकष लावून यापेक्षा कमी भावात सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.दरम्यान अहमदनगर, उस्मानाबाद ,लातूर , नांदेड या जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात सोयाबीन या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. दरम्यान, सोयाबीन या पिकाला लागेल तसा पाउस देखील पडल्याने सोयाबीन हे पिक अंत्यंत उत्तम प्रकारे आलेले आहे. त्यामुळे सोयाबीन

 या पिकाची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने या पिकाचा भाव निश्चितपणे कमी होणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना यंदा हे पिक नक्कीच नुकसानीत घालणार असल्याचा अंदाज काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!