Monday, October 18, 2021

पितृपक्षात ‘या’ गोष्टी दिसणे असते अत्यंत शुभ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी पितृपक्षात श्राद्ध केली जातात. यामुळे पितरं सुखी होतात आणि आपल्याला आशिर्वाद देतात अशी बहुसंख्य लोकांची श्रद्धा आहे. पितरांची तुमच्यावर कृपादृष्टी असल्यास त्याचे काही संकेत मिळतात असंही सांगितलं जातं. हे शुभसंकेत कोणते असतात ते आपण पाहूयात.

कावळ्यासाठी ठेवलेले अन्न जर त्याने खाल्ले तर पितरं संतुष्ट असल्याचा तो संकेत असतो. पितरं संतुष्ट असल्याने कावळ्याच्या रुपात तुम्ही दिलेलं अन्न त्यांनी ग्रहण केलं असं मानलं जातं. पितृपक्षामध्ये घराच्या छतावर कावळा येऊन बसल्यास तो पितरांचा आशिर्वाद मानला जातो, आणि अनेकांचा समज आहे की यातून घरात भरभराटही होते.

घरासमोर येऊन बसलेल्या कावळ्याच्या चोचीत काडी असेल तर तो धनलाभ होणार असल्याचा संकेत मानला जातो. कावळ्याच्या चोचीत जर फूल किंवा पान असेल तर तुम्ही पितरांकडे जी मनोकामना मागाल ती पूर्ण होईल असा संकेत असतो.कावळा धुळीने माखला असेल तर तो अचानक धनलाभाचे संकेत देतो असं काहींचं म्हणणं आहे. कावळा अन्नधान्याच्या ढिगाऱ्यावर

 बसलेला दिसल्यास तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल असा अर्थ अनेकजण काढत असतात. गाय किंवा डुकराच्या पाठीवर बसलेला कावळा दिसल्यास तो देखील एक शुभसंकेत मानला जातो.यंदा 21 सप्टेंबरपासून महालय आरंभ झाला. पितरांना दिलेले त्यांना लवकर प्राप्त व्हावे म्हणून सूर्याचे पृथ्वीच्या सर्वात जवळचे अंतर असलेला काळ हा महालयासाठी योग्य ठरविला आहे.

चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही, पण सूर्याची सुषुम्ना नावाची राशी चंद्रमंडलाला प्रकाशित करते. अमावास्येला सूर्यमंडलाजवळ चंद्रमंडल येत असते म्हणूनच सर्वपित्री अमावास्या पितरांसाठी योग्य ठरविली गेली आहे.पितर वायुरूपाने आपल्या वंशाच्या जवळ येतात तोच हा काळ आहे. या श्राद्धात केवळ आपले पितरच असतात असे नाही, तर धर्मपिंड या व्यवस्थेनुसार दोन्ही कुलातील जन्मांतरीचे दास,

पोष्य, आश्रित किंवा सेवक, तसेच मित्र-मैत्रिणी, सहवासात आलेले पशू, झाडे, दृष्ट स्वरूपात-स्पर्श स्वरूपात आलेले निरनिराळे उपकार केलेले, अन्य जन्मामध्ये जे आपल्याबरोबर होते .त्यांचासुद्धा यात शास्त्राने समावेश केलेला आहे. इतकेच नाही तर पितृकुल-मातृकुलामधील समस्त व्यक्ती, गुरू, श्वशूर, बंधू आणि त्यांचे आप्तसंबंधी किंवा ज्या गेलेल्या व्यक्ती अविवाहित किंवा निपुत्रिक

 असतील, जे जन्मांध पांगळे असतील त्यांचा आणि अन्य ज्ञात-अज्ञात मंडळींचाही श्राद्धात आदरपूर्वक विचारविनिमय नक्कीच पाहावयास मिळतो. त्याही पुढे वनात किंवा कुंभीपाक नरकात गेलेल्यांचाही विचार केलेला आहे. म्हणजेच पूर्वजांनी ही व्यवस्था किती दूरदृष्टीने केलेली आहे.ज्यांनी आपल्या पोषणासाठी कष्ट घेतले, काळजी घेतली, विज्ञान क्षेत्रात अनंत प्रकारचे कष्ट सोसून सुखसाधने निर्माण केली त्यांचे

 या स्वरूपात आभार मानणे आपले कर्तव्यच ठरते. ज्या पशूंनी म्हैस, बैल, घोडा, कुत्रा वगैरे आपल्या जीवनाला उन्नती दिली त्यांना विसरणे कितपत योग्य आहे? म्हणूनच सर्वांचे ऋण फेडण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही व्यवस्था पितरांसाठीचा नक्कीच मुक्तीचा मार्ग ठरेल.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!