Saturday, January 22, 2022

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दक्ष करण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून एफआरपी वेळेत न देणाऱ्या कारखान्यांची यादी प्रसिद्ध

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गाळप हंगाम 2021-22 मध्ये घ्यावयाची दक्षते बाबद साखर आयुक्तालयाने नियमित एफआरपी रक्कम अदा करणारे कारखाने, विलंबाने एफआरपी रक्कम अदा करणारे कारखाने आणि ज्या कारखान्यांनी एफआरपी वेळेत रक्कम अदा केलेली नाही तसेच ज्या कारखान्यांचे आरआरसी आदेश निर्गमित झालेले आहेत त्या साखर कारखान्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवड यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे की,राज्याचा ऊस गाळप हंगाम 2021-22 हा दि.15 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या विभागातील जवळच्या संबंधित साखर कारखान्याकडे त्यांच्या ऊसाची नोंद केलेली आहे.गाळप हंगाम 2020-21 मध्ये रास्त व किफायतशीर

ऊसदराची (एफआरपी) रक्कम संपूर्णपणे काही कारखान्यांनी विहीत कालावधीत अदा केलेली आहे. तर काही कारखान्यांनी विहित कालावधी उलटूनही एफआरपीची रक्कम अदा केलेली नाही. शेतकऱ्यांकडून सातत्याने एफआरपीची रक्कम कमी प्राप्त झाली, प्राप्त झालेली नाही किंवा विलंबाने प्राप्त झालेली आहेत

अशा स्वरुपाच्या तक्रारी शासनाकडे व साखर आयुक्तालयाकडे वारंवार प्राप्त होतात. या तक्रारीमध्ये मुख्यतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त रकमेचे आमीष दाखविणे, परंतु ती रक्कम न देणे, ऊस गाळपास नकार देणे, हंगामाच्या सुरुवातीच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे व हंगामाच्या शेवटच्या महिन्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची

रक्कम थकीत ठेवणे अशा बाबी आढळल्या आहेत. काही निवडक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा थोडी जास्त रक्कम देवून त्यानंतर बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणे अशा अनिष्ठ प्रथादेखील आढळून आलेल्या आहेत. त्या संदर्भात सातत्याने विविध संघटनांमार्फत साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चे, उपोषण,

धरणे इत्यादी आंदोलने होत असतात. काही कारखाने नेहमीच एफआरपीची रक्कम ऊस पुरवठादार शेतकन्यांना विलंबाने अदा करीत असतात. त्यामुळे अशा साखर कारखान्यांच्या विरुद्ध साखर आयुक्तालयास आरआरसी आदेश निर्गमित करावे लागतात.त्याउलट राज्यातील काही साखर कारखाने वेळेवर व अचूक पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची

रक्कम अदा करीत आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखाना कोणता हे ऊस पुरवठादार शेतकऱ्याला सहज समजावे या हेतूने शेतकऱ्याला योग्य ती माहिती पुरविणेबाबत मा. मंत्री सामितीच्या दि.13 सप्टेंबर 2021 च्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे.शेतकऱ्यांनी कोणत्या साखर कारखान्यास ऊसाचा पुरवठा करावा

याबाबत निर्णय घेणे त्यांना सोपे व सुलभ होण्याकरीता नियमित एफआरपी अदा करणारे, हंगामात थोड्या विलंबाने एफआरपी अदा करणारे व हंगाम संपूनही मुदतीत एफआरपी अदा न करणारे तसेच आरआरसी आदेश निर्गमित झालेल्या कारखान्यांची माहिती ऊस पुरवठादार शेतकऱ्यांकरीता प्रसिद्ध करणे आवश्यक झाले आहे.

त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने राज्यातील साखर कारखान्यांची एफआरपी देण्याची आर्थिक सक्षमता समजावी या हेतूने गाळप हंगाम 2020-21 या मागील ऊस हंगामातील माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.गाळप हंगाम 2021-22 सुरु होताना राज्यातील शेतकऱ्यांना

कारखान्यास ऊस पुरवठा करण्याबाबत सुयोग्य निर्णय घेणेकरीता साखर आयुक्तालयाने हे परिपत्रक निर्गमित केले असून हे परिपत्रक https://sugar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!