Friday, January 21, 2022

नगर ब्रेकींग: युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभळगाव येथील शेतकरी राजू आसाराम घोरपडे वय वर्ष 42 यांनी सोमवारी रात्री घरासमोरील पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राजू घोरपडे यांनी वैजू बाभळगाव सेवा संस्थेसह, बँका व खाजगी फायनान्स कंपन्यांचे देखील कर्ज घेतले होते गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेली करोना महामारी व नैसर्गिक आपत्तीमुळे घोरपडे

यांना कर्जाचे हप्ते वेळेवर फेडणे शक्य झाले नाही. त्यामुळे संबंधितांकडून कर्ज वसुलीसाठी घोरपडे यांच्याकडे वारंवार तागदा होत असल्याचे घोरपडे यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

त्यानंतर सोमवारी रात्री दोरीने गळफास घेतला व आपले जीवन संपवले. घरातील कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना नगरच्या सरकारी रुग्णात हलवले, परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. दुसऱ्या दिवशी उत्तरीय तपासणीनंतर

त्यांचा मृत्यदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई,वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. घोरपडे यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!