Friday, December 3, 2021

मंत्री गडाख म्हणाले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जिंकायच्याच कामाला लागा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे. या तालुक्यात जलसंधारणाचे जास्तीत जास्त काम करुन तालुक्याचा दुष्काळ हटविणार आहोत. भातोडी येथील तलावाचे हस्तांतरण करुन तलावाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

त्यामुळे तलावावर अंवलबून असणार्‍या गावांना याचा फायदा होईल, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.गाव तेथे शिवसेनेची शाखा, अभियानाअंतर्गत नगर तालुक्यांतील चिंचोडी पाटील गणातील निंबोडी, सारोळाबद्दी, टाकळी काझी, मदडगाव, सांडवा, कोल्हेवाडी, मदडगाव, दशमी गव्हाण

या गावामध्ये शिवसेना शाखेचे नूतनीकरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. शाशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, सभापती संदीप गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, प्रविण कोकाटे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, प्रविण गोरे, शंकर ढगे, विलास शेडाळे, जीवाजी लगड, प्रकाश कुलट, बी. डी. कोतकर उपस्थित होते.

गडाख म्हणाले, शाखेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवले जाणार आहेत. नगर तालुक्यातील एका महिन्यात प्रत्येक गावात शाखा उद्घाटन करुन गावाला भेटी देणार असून शिवसेना भक्कम करणार आहोत. यावेळी जलसंधारणमंत्री गडाख यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सर्व समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.यावेळी अविनाश पवार, शहाजी आटोळे, अशोक ढगे, संतोष ढगे, गुलाब सय्यद, आकाश आठरे, प्रमोद काळे, नंदू आठरे, भरत शेडाळे, अक्षय सुंबे, संदीप खामकर, अशोक आवारे, प्रकाश बोरुडे, संजय ढगे, रमेश गव्हाणे, संतोष कुठे, सुरेश कराळे, संतोष काळे, राजेंद्र काळे, नामदेव काळे, अजय बोरुडे, अमोल खांदवे उपस्थित होते.

वर्षभरामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेला मानणारा वर्ग मोठा असल्यामुळे कोणत्याही

परिस्थितीत निवडणुका जिंकायच्याच असे सांगत शिवसैनिकांनी कामाला लागावे असे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!