Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यातील या पालिकेचे भाजपाचे नगरसेवक तडकाफडकी निलंबित

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायतीमधील भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडून आलेले रणजीत दत्तात्रय सोनवणे व दिनेश प्रताप व्यवहारे या दोन नगरसेवकांना पक्षविरोधी काम केल्याने भारतीय जनता पार्टीतून निलंबित करण्यात आले असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केली.

नेवासा नगरपंचायतीची दुसरी निवडणूक एप्रिल 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर व तालुका भाजप अग्रेसर झालेले दिसून येत आहे. भाजपच्या तीन बैठका झाल्या असून त्यात प्रभाग निहाय अभ्यास व संपर्क सुरू करण्यात आलेला आहे.

नेवासा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी त्यांची निवड झाल्यावर शहराध्यक्षांसह शहर चिटणीसांचे पक्षाातून निलंबन केले होते. आता नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर दोन नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 15 मधून एकतर्फी निवडून आलेले दिनेश व्यवहारे व प्रभाग क्रमांक 9 मधून केवळ एक मताने निवडून आलेले रणजीत सोनवणे अशी निलंबित नगगरसेवकांची नावे आहेत.

या निलंबन कारवाईच्या पत्रकात म्हटले आहे की, या दोन्ही उमेदवारांच्या 2017 सालच्या विजयामध्ये पक्षाचा मोठा वाटा होता. त्यानंतर वेळोवेळी पक्ष्याच्या पदाधिकार्‍यांकडून निरोप येऊनही पक्ष कार्यक्रमात उपस्थित न राहता विरोधकांच्या कार्यक्रमात हे दोघेही उपस्थित राहत होते.

त्यांचे पक्षविरोधी काम सुरू असल्याने दखल घेऊन पक्षाने या दोन नगरसेवकांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!