Saturday, November 27, 2021

मोठी बातमी! आता गर्भपात करण्यासाठी 20 नव्हे तर 24 आठवड्यांपर्यंत परवानगी, नियम व अटी वाचा!

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (सुधारणा) अधिनियम, 2018 च्या संदर्भात अधिसूचना काढली आहे. त्यानुसार आता गर्भपाताची वेळ मर्यादा 20 आठवड्यांवरून वाढवून 24 आठवडे करण्यात आली आहे. मात्र, यासाठी काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत.

परंतू या कायद्यामध्ये आणखी सुधारणा होणे अपेक्षित आहे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 24 आठवड्यांच्या कालमर्यादेसह ही सुधारणा सर्व महिलांना समानपणे लागू होणार नाहीये. दुरुस्तीनुसार, हे फक्त बलात्कार पीडित, अल्पवयीन किंवा असामान्य गर्भधारणेच्या प्रकरणांसाठीच लागू होणार आहे.

गर्भपाताची वेळ 20 आठवड्यांवरून वाढवून 24 आठवडे करण्याची ही मोहीम सुरू करणारे मुंबईतील डाॅक्टर निखिल दातार ज्यांनी 2008 मध्ये आंदोलन केले होते.ते म्हणतात की, अजून बरेच काम करायचे आहे, त्यामुळे केस मागे घेतली जाणार नाहीये. गेल्या 5 वर्षांत, 300 हून अधिक प्रकरणे आहेत.

जिथे 20 आठवड्यांच्या मुदतीनंतर महिलांनी गर्भपाताची परवानगी मागितली होती. डॉ दातार म्हणाले की, न्यायालयाने अशा प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन केले आहे. दुरुस्ती लागू झाल्यानंतर, आम्हाला अशी प्रणाली पुन्हा स्थापित करावी लागेल.

2008 मध्ये डॉक्टर दातार यांनी त्यांच्या एका रुग्णासंदर्भात प्रथम मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालय गाठले होते. निकिता मेहता नावाच्या रुग्णाला 24 व्या आठवड्यात गर्भपात करायचा होता. कारण तिच्या गर्भाच्या हृदयात काही समस्या होत्या. मात्र, निकिताला गर्भपात करण्याची

परवानगी नव्हती आणि नंतर तिने आपले मूल गमावले. यानंतर, डॉक्टर दातार यांनी गर्भपाताची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. आणि त्याविरोधीत आंदोलने देखील केली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!