Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यातील प्रकार:आईच्या कुशीतून अवघ्या सोळा दिवसाच्या बालिकेचे अपहरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आईच्या कुशीत झोपलेल्या अवघ्या सोळा दिवसाच्या बालिकेचे अज्ञात आरोपीने नगर येथे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे क्वार्टरजवळ 20 सप्टेंबर रोजी रात्री

अकरा ते दोन या वेळेत ही घटना घडली. सदर प्रकरणी बालिकेची आई सुनिता कपिले यांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.श्रीरामपूर येथून रोजगारासाठी आलेले सुनील कपिले व त्यांची पत्नी सुनीता हे दाम्पत्य शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे कॉटरजवळ राहतात.

3 सप्टेंबर रोजी त्यांना मुलगी झाली होती. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचे श्रावणी असे नाव ठेवण्यात आले आणि कन्यारत्न झाल्यामुळे दोघेही पती-पत्नी अत्यंत आनंदात होते मात्र त्यांच्या आनंदाला 20 सप्टेंबर रोजी ग्रहण लागले.रात्री जेवण करून सुनिता या सोळा दिवसाच्या श्रावणीला कुशीत घेऊन झोपल्या.

त्यांना गाढ झोप लागली असताना अज्ञात व्यक्तीने श्रावणीला पळवून नेले. सुनील आणि सुनीता जागे झाले तेव्हा त्यांना श्रावणी कुठे दिसली नाही. इतरत्र शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर दोन दिवस या दाम्पत्याने त्यांचा शोध घेतला मात्र अखेर कुठेही मिळून न आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली .

सदर प्रकरणाचा पोलिस तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करत आहे.

ताज्या बातम्या

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना हे देणार बांगड्यांचा आहेर ?

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये, बनावट सोनेतारणचे 6 कोटी रुपये तसेच शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये...

नगर जिल्ह्यात या ठिकाणी गावरान कांद्याला विक्रमी भाव…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले.गावरान कांद्याची सुमारे 17 हजार 715 कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला 3000 ते 3300 रुपयांचा...
error: Content is protected !!