Wednesday, December 8, 2021

आरोग्य विभाग भरती परीक्षांची तारीख जाहिर, आरोग्यमंत्र्यांनी केली घोषणा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. येत्या 24 ऑक्टोबरला ‘क’ गट भरती परीक्षा तर 31 ऑक्टोबरला ‘ड’ गट भरती परीक्षा होणार आहे.

9 दिवसांपूर्वी हॉल तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. रविवार असल्यामुळे शाळा उपलब्ध असतील, त्या अनुषंगाने या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. डॅशबोर्ड सर्व परीक्षा केंद्रांची माहिती दिली पाहिजे, परीक्षार्थी विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या

आहेत अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, मोठ्या भरतीची परीक्षा असेल, तर त्यामध्ये अनेक वावड्या उठवल्या जातात किंवा काही जण चुकीचं काम करतात, त्यावर अत्यंत कठोर कारवाई व्हावी, अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.

यानंतरही अशा स्वरुपाची कोणी मागणी केली, काही गैरमार्गाचा वापर करण्यात आला तर त्या विद्यार्थ्याने किंवा पालकांनी संबंधित पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावी. असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. परीक्षा पारदर्शी व्हाव्यात, यामध्ये कोणतीही गडबड होणार नाही याची काळजी आम्ही घेत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

न्यासा नावाची जी संस्था आहे ती संस्था आरोग्यविभागाकडून ठरवण्यात आलेली नव्हती. माहिती आणि तंत्रज्ञान विभाग याबाबतची निवड करत असते, त्यामुळे त्याबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो त्या विभागाने घ्यावा, प्रश्नपत्रिका तयार करणं, एवढीच आरोग्य खात्याची जबाबदारी असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना खात्री देऊ इच्छितो की अत्यंत पारदर्शी पद्धतीने परीक्षा घेण्याचा आमचा निर्णय आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप्स असतात

त्यातली तथ्यता पोलीस तपासतील, आणि आम्हाला नावं कळली तर आम्ही तक्रार देऊ, आम्ही अमरावती आणि पुणे एसपीला पत्र देऊन कळवलं आहे, असंही राजेश टोपे म्हणाले

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!