Wednesday, December 8, 2021

आमदार निलेश लंकेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा निशाण; ट्विट केला ‘तो’ फोटो

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील
पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा निशाण साधला आहे. ट्विटरवर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत विमान प्रवासाचा फोटो पोस्ट करत ‘एका महिलेला हटवल्याचा आसूरी आनंद दिसतोय चेहऱ्यावर’ अशी टीका केली आहे.

तत्कालीन तहसिलदार ज्योती देवरे आणि आमदार लंके यांच्यात वाद निर्माण झाला होता. याचे परिणाम राज्यभर उमटले. देवरे यांचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. चौकशीअंती देवरे यांची बदली झाली. मात्र देवरे यांची बाजू घेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आ.लंके यांच्यावर अनेक आरोप केले होते.

प्रकरण शांत झालेले आहे, असे वाटत असताना वाघ यांनी पुन्हा एकदा लंकेंवर निशाणा साधत, या प्रकरणात पिच्छा पुरवणार असल्याचे संकेत दिले आहेत.सोमवारी सकाळी वाघ यांनी एक फोटो ट्विट केला आहे. यात आ. लंके आपल्या काही मित्रांसोबत विमान प्रवास करत असल्याचे दिसत आहे. या फोटोत

पोलीस निरीक्षक बळप आणि पोलीस कर्मचारी दिवटे असल्याचा दावा वाघ यांनी केला आहे. आमदार या दोन पोलिसांना विमानाने फिरवून आणत आहेत. आमदार एवढी बडदास्त ठेवताय म्हटल्यावर पोलिसांसमोर महिलांना शिव्या देवो किंवा हात उगारो, जीभ कशी रेटेल बोलायला आणि हात कसे उठतील कारवाईला ?, असा सवाल वाघ यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!