Friday, December 3, 2021

नेवासा भाजपकडून रस्त्यातील खड्ड्यांचे पूजन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा-श्रीरामपूर रोडवरील खड्ड्यांचे विधिवत पूजन करून भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी राज्य सरकार व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला.या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, युवामोर्चा अध्यक्ष प्रताप चिंधे शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी केले.

तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था खिळखिळी झाली आहे. नेवासा शहरातील प्रवरा नदीच्या पुलालगत असलेल्या नेवासा-श्रीरामपूर रोडवरील खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
आठ ते दहा दिवसांच्या आत तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास नेवासा फाटा येथे तीव्र स्वरूपाचे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी दिला आहे.

यावेळी शहर उपाध्यक्ष अनिल परदेशी, मोर्चा तालुकाध्यक्ष स्वप्निल जरे, येडूभाऊ सोनवणे, पोपट शेकडे, नगरसेवक सुनील वाघ, राजेंद्र मापारी आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!