Saturday, November 27, 2021

किशोर मिसाळ यांची विधवा महिला पुर्नवसन व जलसंधारण कार्यासाठी आर्थिक मदत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील भेंडा येथील कृषी पदवीधर व प्रगतशील शेतकरी किशोर मिसाळ यांनी कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसन मदत व जलसंधारण कार्यासाठी आर्थिक मदत प्रत्येकी 11 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

भेंडा बुद्रुक येथील सामाजिक , शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात कार्यरत असलेले किशोर अशोकराव मिसाळ या कृषी पदवीधर युवकाने स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी एक आदर्श पायंडा घालुन दिला. त्यांनी नेवासा फाटा येथील शरणपुर वृध्दाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन दिले. तसेच जलसंधारण चळवळीत रेन वाॕटर हार्वेस्टिंगचे प्रभावी काम करणारे पत्रकार सुखदेव फुलारी यांच्या कार्यासाठी व पत्रकार-सामाजिक कार्यकर्ते कारभारी गरड हे कार्यरत असलेल्या कोरोनामुळे एकल (विधवा) झालेल्या महिलांच्या मदतीसाठी दोघांना प्रत्येकी 11 हजार रुपये मदत दिली. भेंडा येथील कारखाना स्मशान भुमित कडुनिंबाची झाडे नसल्याने ती लावणेसाठी कडूनिंबाची रोपे डॉ. शिवाजीराव शिंदे यांचेकडे सुपुर्द केली.

यावेळी नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम मिसाळ,गणेशराव गव्हाणे,गुलाबराव आढागळे,देविदास गव्हाणे,अंबादास गोंडे,अण्णासाहेब गव्हाणे,डॉ.रामराव आढाव, कादर सय्यद,देवेंद्र काळे,नामदेव शिंदे,यडूभाऊ सोनवणे,सम्मत शेख,बाळासाहेब गोत्राळ,संभाजी सोनवणे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!